BSNL Recharge Plan : BSNL ही भारतातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी शानदार रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीचे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
असेच कंपनीने दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत ज्याची किंमत प्रतिदिन 3 रुपये आणि 4 रुपये आहे.या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंग, डेटासह अनेक फायदे मिळत आहेत. काय आहे BSNL चा हा जबरदस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन जाणून घ्या.
BSNL चा 1198 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
BSNL चा 1198 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 12 महिने म्हणजेच 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. एकंदरीतच या प्लॅनची दैनिक किंमत एकूण 3 रुपये असणार आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला वर्षभर पुन्हा रिचार्ज करावा लागणार नाही. या प्लॅन अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर 300 मिनिटे व्हॉइस कॉल तसेच 3GB मासिक हाय-स्पीड डेटा वापरता येईल. तसेच ग्राहकांना संपूर्ण 12 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 30 एसएमएस मिळतील.
जर ग्राहकाने सध्याची वैधता संपण्यापूर्वी त्याच व्हाउचरने दुसऱ्यांदा रिचार्ज केल्यास त्यांची न वापरलेली वैधता जमा करण्यात येते. खरंतर कमी किंवा मर्यादित व्हॉईस कॉल करणार्या वापरकर्त्यांसाठी BSNL चा प्लॅन हा सर्वोत्तम पर्याय आहे. समजा तुम्हाला तुमचा बीएसएनएल नंबर दुय्यम क्रमांक म्हणून सक्रिय ठेवायचा असल्यास या योजनेचाही विचार केला जाऊ शकतो.
तसेच जर तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस बेनिफिट्ससह दीर्घकाळ वैधता पाहिजे असेल, तर BSNL कडे त्याच्या वापरकर्त्यांसाठी 1,499 रुपयांचे प्लॅन व्हाउचर उपलब्ध आहे. जाणून घ्या या प्लॅनचे फायदे.
BSNL चा 1499 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
कंपनीच्या दुसऱ्या प्रीपेड प्लॅनची किंमत 1499 रुपये इतकी आहे, यात ग्राहकांना 336 दिवसांची वैधता मिळते, म्हणजे या प्लॅनची दैनिक किंमत एकूण 4 रुपये इतकी आहे. तर कमी वैधता असूनही, या प्लॅनमध्ये अनेक फायदे मिळतात. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा उपलब्ध आहे.
अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगशिवाय, ग्राहकांना संपूर्ण 336 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येतो. तसेच या प्लॅनमध्ये 24GB बल्क हाय-स्पीड डेटा मिळत आहे. कंपनीच्या प्लॅन व्हाउचर 1198 प्रमाणे, यात देखील वैधता जमा आहे