टेक्नोलाॅजी

7 हजार रुपयापेक्षा कमी किमतीत खरेदी करा लाव्हाचा ‘हा’ स्मार्टफोन! मिळेल 50MP कॅमेरा आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी

Lava O3 Pro Smartphone:- भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोन सध्या लॉन्च करण्यात येत असून त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये उत्तम असे स्मार्टफोन मिळणे सोपे झाले आहे.

अगदी याच पद्धतीने देशांतर्गत असलेल्या लावा या कंपनीने नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला असून Lava O3 Pro असे त्याचे नाव असून हा कंपनीचा नवीन बजेट हँडसेट आहे.

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने UniSoC चीपसेट वापरले असून त्यासोबतच 6.56 इंचाचा एलसीडी स्क्रीन आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज सारखी उत्तम अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

काय आहेत लावा O3 Pro स्मार्टफोन मधील वैशिष्ट्ये?
कंपनीने या स्मार्टफोनला 6.56 इंच असलेला एलसीडी स्क्रीन दिली असून जी HD+(1603×720 पिक्सल) रिझोल्युशन देते. तसेच या स्मार्टफोनच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90 Hz इतका आहे व त्यामध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे. लावाने या स्मार्टफोनमध्ये UniSoC T606 प्रोसेसर दिला आहे.

तसेच या स्मार्टफोन मध्ये चार जीबी रॅम असून ही रॅम चार जीबी पर्यंत वर्च्युली वाढवता येते.तसेच या स्मार्टफोनमध्ये इंटरनल स्टोरेज 128 जीबी देण्यात आला आहे व मायक्रो एसडी कार्डद्वारे हे स्टोरेज वाढवता येणे शक्य आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड 14 सह येतो. तसेच कॅमेरे जर बघितले तर या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एआय लेन्स दिले आहेत.

उत्तम व्हिडिओ कॉल आणि सेल्फी करिता या स्मार्टफोनमध्ये आठ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनची बॅटरी बघितली तर यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G, ब्लूटूथ 5.0, जीपीएस तसेच यूएसबी टाईप सी सारखी इतर वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. या स्मार्टफोनचे वजन 201 ग्रॅम आहे व सुरक्षा करिता हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सारखी वैशिष्ट्ये देखील दिली आहेत. या बजेट स्मार्टफोनमध्ये 3.5 mm ऑडिओ जॅक आणि मोनो स्पीकर देण्यात आला आहे.

किती आहे या स्मार्टफोनची किंमत?
नवीन लावा O3 Pro स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत 6999 रुपये आहे. तुम्हाला जर हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही ॲमेझॉन इंडिया वरून खरेदी करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts