Cheapest Recharge Plan : स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाटयाने वाढली आहे. अनेकजण आपल्या फोनमध्ये दोन सिम कार्डचा वापर करतात. रिलायन्स जिओ आणि Airtel या देशातील सर्वात उत्तम टेलिकॉम कंपन्या आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळे प्लॅन आणत असतात.
दरम्यान, मार्केटमध्ये या दोन्ही कंपन्यांमध्ये आपल्याला टक्कर पाहायला मिळते. या दोन्ही कंपन्यांनी आपली 5G सेवा सुरु केली आहे. आता या कंपनीने आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. या कंपन्यांच्या ग्राहकांना खूप स्वस्तात अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच इतर अनेक फायदे देखील मिळत आहेत.
रिलायन्स जिओचा 219 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचा हा शानदार प्लॅन एकूण 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी प्रत्येक दिवशी ३ जीबी डेटा मिळतो. इतकेच नाही तर कंपनीकडून या प्लॅनमध्ये 25 रुपयांचा अतिरिक्त डेटा देखील देण्यात येत आहे. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देखील देत आहे.
समजा तुम्ही कंपनीच्या या प्लॅनची सदस्यता घेतली तर, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. त्याशिवाय या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी दररोज 100 मोफत एसएमएस देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तुम्हाला या प्लॅनमध्ये Jio Cinema आणि Jio TV वर मोफत प्रवेश मिळेल.
एअरटेलचा 239 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
एअरटेलचा हा प्लॅन एकूण 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1 GB डेटा देते. जर तुम्ही Airtel ची 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणाऱ्या भागात रहात असाल, तर तुम्हाला या प्लॅनमध्ये कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळेल. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगही मिळेल. शिवाय कंपनीचा हा शानदार प्लॅन वापरकर्त्यांना विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे.