Cheapest Recharge Plan : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया या खाजगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तसेच बीएसएनएल ही सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. या सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक शानदार प्लॅन ऑफर करतात. या 4 ही कंपन्यांकडे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत.
या कंपन्यांमध्ये सतत टक्कर पाहायला मिळते. ग्राहक त्यांच्या बजेटनुसार रिचार्ज प्लॅन घेतात. सध्या असाच एक प्लॅन एका कंपनीने आणला आहे. ज्यात तुम्हाला 90 दिवसांच्या वैधतेसह शानदार फायदे मिळतील. हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. विशेष म्हणजे या प्लॅनची किंमत फक्त 22 रुपये आहे.
होय, आता तुम्ही 22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन स्वीकारून तुमचे सिम एकूण 90 दिवस अॅक्टिव्ह ठेवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की असा प्लॅन इतर कोणत्याही कंपनीने नाही तर सरकारी टेलिकॉम कंपनी ऑफर केला आहे. जाणून घेऊया कोणती सरकारी टेलिकॉम कंपनी 22 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे.
कोणती कंपनी ऑफर करत आहे प्लॅन?
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडून आपल्या ग्राहकांसाठी आता केवळ 22 रुपयांचा प्लॅन ऑफर केला जात आहे. यामुळे Airtel, Jio, Vi सारख्या कंपन्यांना टक्कर मिळते, परंतु फरक इतकाच आहे की हा रिचार्ज प्लॅन 3G च्या सपोर्टसह येतो. सध्या या कंपनीकडून 4G नेटवर्क आणण्यासाठी तयारी सुरू आहे.
सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी ऑफर केलेला 22 रुपयांचा प्लॅन सिम अॅक्टिव्हसाठी खूप स्वस्त मानला जातो. हा प्लॅन कंपनीच्या ग्राहकांना एकूण 90 दिवसांसाठी वापरता येईल. हा सर्वात स्वस्त प्लॅन मानला जातो जो 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर लोकल आणि एसटीडी व्हॉइस कॉलिंगसाठी 30 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारण्यात येते. परंतु हे लक्षात घ्या की कंपनीचा हा प्लॅन फ्री व्हॉईस कॉलिंग आणि डेटा लाभांसह येत नाही.