घर ही गोष्ट प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून प्रत्येकाला स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते. तसेच घर बांधताना प्रत्येक जण अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन करण्याकडे भर देतात. तसेच व्यवस्थित प्लॅनिंग देखील केली जाते. कारण म्हणतात घर एकदाच बांधले जाते ते परत परत बांधले जात नसल्यामुळे एकाच वेळी त्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा उभारण्याकडे प्रत्येकाचा कल असतो.
आपल्या घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असावे असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो व त्या दृष्टिकोनातूनच घर बांधले जाते. घर बांधण्यासाठी प्रामुख्याने सिमेंट, स्टील आणि विटांचा वापर केला जातो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु उत्तर प्रदेश राज्यातील फिरोजाबाद येथे रहिवासी असलेले अरिहंत जैन यांनी मात्र त्यांच्या घरामध्ये सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाही. अरिहंत जैन यांनी उभारलेले घर हे इतर लोकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरताना दिसून येत आहे.
सिमेंट ऐवजी घर बांधण्यासाठी
केला गायीच्या शेणाचा वापरयाबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील फिरोजाबाद येथील रहिवासी अरिहंत जैन यांनी घर बांधले असून त्यांनी घर बांधण्याकरिता सिमेंटचा वापर न करता चक्क चूना आणि गाईच्या शेणाचा वापर केला आहे. यामध्ये त्यांनी गाईचे शेण व चून्यामध्ये इतर काही महत्त्वाचे पदार्थांचा वापर करून त्यांनी संपूर्ण घर व्यवस्थित सजवले आहे. अरिहंत जैन यांनी बांधलेले हे घर दिसायला खूपच सुंदर आहेच परंतु त्यातील वातावरण हे देखील खूप सुंदर असे आहे.
चुना आणि शेणाचा वापर करून या घराला इतक्या सुंदर पद्धतीने आणि अनोखे असे प्लास्टर करण्यात आले आहे की त्यामुळे या घराच्या भिंती थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यात अतिशय उबदार आणि उन्हाळ्यामध्ये गार राहील असा देखील दावा अरिहंत जैन यांनी केला आहे. तसेच घरामध्ये कुठल्याही प्रकारचा विषाणूचा शिरकाव होणार नाही. कारण हे प्लास्टरच विषाणूंचा नायनाट करेल असं देखील अरिहंत जैन यांनी म्हटले आहे.
गाईच्या शेणाचे महत्त्वाचे फायदे
गाईच्या शेणामध्ये नैसर्गिक रिपेलेंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात जे कृषी क्षेत्र आणि भागांमधील कीटक व रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी खूप फायद्याचे असतात. शेना पासून बनवलेले द्रावण वापरणे आणि त्याचा जमिनीत वापर करणे यामुळे रासायनिक कीटकनाशके आणि कृत्रिम खतांची गरज कमी होण्यास मदत होते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे अनेक पारंपरिक विधी आणि समारंभांमध्ये गाईच्या शेणाचा वापर केला जातो. आपल्याला माहित आहेस की गाईच्या शेणाचा केक( गोवऱ्या) हा अनेक प्रकारच्या पवित्र अग्नीसाठी वापरला जातो व पवित्रता व शुभतेचे प्रतीक मानला जातो.
नैसर्गिक बांधकाम साहित्य म्हणून वापर
काही ठिकाणी गाईच्या शेणाचा वापर बांधकामात केला जातो. या शेणाचा पेंढा, चिकन माती आणि पाण्यात मिसळल्याने एक टिकाऊ सामग्री तयार होते ज्याला आपण कोब असे म्हणतो व ही सामग्री एक पर्यावरण पूरक, टिकाऊ वास्तू कलांमध्ये भिंती तसेच मजले आणि अगदी छत तयार करण्यासाठी देखील वापरले जाते.
औषधी उपयोग
आयुर्वेद सारख्या पारंपारिक औषध पद्धतीमध्ये गायीच्या शेणात औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. हे त्याच्या प्रतिजैविक आणि डिटॉक्सिफायिंग प्रभावांकरिता काही फार्म्युलेशनमध्ये देखील वापरले जाते. गोबर आंघोळ आणि एप्लीकेशन्स त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात आणि त्वचेच्या काही समस्यांचे निराकरण करतात असे देखील मानले जाते.
कीटकांना प्रतिकारक
गाईच्या शेणाचा वापर हा पिके तसेच बाग आणि घरापासून कीटकांना व जनावरांना दूर ठेवण्यासाठी देखील नैसर्गिक प्रतिकारक म्हणून केला जातो. या शेणाचा तीव्र वास आणि काही रासायनिक संयुगे प्रतिबंधक म्हणून काम करतात. त्यामुळे रासायनिक कीटक नियंत्रण पद्धतीची गरज कमीत कमी भासते.
या व्यक्तीने गाईच्या शेणापासून तयार केले वैदिक प्लास्टर
दिल्लीपासून 70 किलोमीटर असलेल्या रोहतक येथील डॉक्टर शिवदर्शन मलिक यांनी गायीच्या शेणाचा वापर करून वैदिक प्लास्टर तयार केले असून त्याचा वापर ते ग्रामीण भागामध्ये आरामदायी आणि एयर कंडीशन ची गरज पडणार नाही अशा घरांच्या निर्मितीसाठी करत आहेत.
तेव्हा त्यांनी या घराचे फायदे सांगतांना म्हटले होते की वैदिक प्लास्टरचा वापर करून बनवलेल्या घरांमध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला एअर कंडिशनर वापरण्याची गरज नाही. या घरांमध्ये उन्हाळ्यात जर बाहेरील तापमान जर 40 अंश डिग्री सेल्सिअस असेल तर आतील तापमान या घरांमध्ये फक्त 28 ते 31 अंश डिग्री सेल्सिअस इतके राहते.
तसेच अशा पद्धतीने घर बांधायचा खर्च हा दहा रुपये पर स्क्वेअर फुट एवढाच येतो. या वैदिक प्लास्टरचा वापर करून तयार केलेल्या घरांमध्ये तुम्ही उन्हाळ्यात फरशीवर जर अनवाणी पायाने फिरले तरी पायांना खूप थंडावा मिळतो म्हणजेच शरीराला त्याच्या आवश्यकतेनुसार या घरांमध्ये तापमान आपल्याला मिळत असते.