टेक्नोलाॅजी

Driving Licence Renew : काय सांगता ! आता घरबसल्या रिन्यू करता येणार ड्रायव्हिंग लायसन्स ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Driving Licence Renew : आपल्या देशात कोरोना काळानंतर खूप काही बदल पाहायला मिळत आहे. आज तुम्ही घरी बसून लाखो रुपयांचे व्यवहार सहज करू शकतात. यातच आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तुम्ही आता घरी बसून फक्त बँकिंग व्यवहार नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स देखील सहज रिन्यू करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो कार असो किंवा बाइक किंवा इतर कोणतेही वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते आणि या ड्रायव्हिंग लायसन्सचीही मुदतही असते. मुदत संपल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करावे लागते.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आता आरटीओच्या अनेक फेऱ्या न मारता तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घरी बसून सहज रिन्यू करू शकतात. चला मग जाणून घेऊया घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

प्रक्रिया सोपी आहे

भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूची प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे. आता हे काम घरी बसून सहज करता येणार आहे आणि तेही ऑनलाइन.

 

या सोप्या स्टेप्स फॉलो करा

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी काही सोप्या स्टेप्सचे पालन करावे लागेल. चला त्या सोप्या स्टेप्सबद्दल जाणून घेऊया.

सर्वप्रथम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://parivahan.gov.in/parivahan/

वर जा.

यानंतर होमपेजच्या डाव्या बाजूला Apply Online वर क्लिक करा.

आता ‘Services on Driving License’ वर क्लिक करा आणि रिन्यू करण्यासाठी स्टेप्स फॉलो करा.

यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासोबत कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

या कागदपत्रांमध्ये जुना अवैध ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा लागेल.

प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फॉर्म फी जमा करा, जी ऑनलाइन सबमिट केली जाऊ शकते.

पूर्ण प्रक्रियेनंतर फॉर्म सबमिट करा. काही दिवस प्रतीक्षा करा आणि रिन्यू केलेला ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या घरी पोहोचेल.

हे पण वाचा :-  Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांना मोठा धक्का ! सरकारने केली धक्कादायक घोषणा ; वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts