टेक्नोलाॅजी

Electricity Saving Tips : रेफ्रिजरेटर आणि घराची भिंत यामध्ये ‘इतके’ अंतर ठेवा! नाही येणार तुम्हाला वाढीव वीज बिल

Electricity Saving Tips:- घरामध्ये आपण पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर तसेच बल्ब आणि इतर महत्त्वाचे इलेक्ट्रिक उपकरणे वापरतो. या सर्वांना विजेचा वापर करावा लागतो तेव्हा ते ऑपरेट होतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे व यामुळे तुम्हाला बऱ्याचदा भरमसाठ वीज बिल येते. विज बिल कमी यावे याकरिता आपण अनेक प्रकारच्या उपाययोजना करतो. परंतु यामध्ये आपल्याला यश मिळून येत नाही.

परंतु घरातील अशा इलेक्ट्रिक गॅजेटच्या बाबतीत विचार केला तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तरी विजेत बचत करण्यास मदत होते व साहजिकच विज बिल देखील कमी येते. अगदी याच पद्धतीने आपण घरातील रेफ्रिजरेटरचा विचार केला तर फ्रिज आपण घरामध्ये ठेवताना ते हॉलमध्ये किंवा किचनमध्ये ठेवतो.

तसेच ठेवताना ते भिंतीला लागून ठेवतो. परंतु यामध्ये रेफ्रिजरेटर आणि भिंत यामध्ये किती अंतर असणे गरजेचे आहे यावर देखील तुमच्या फ्रिज किती वीज खर्च करते किंवा वीज बिलामध्ये बचत करण्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे.

 फ्रिज आणि भिंत यामध्ये किती अंतर असावे?

त्या बाबतीत जर आपण विचार केला तर फ्रिज हे प्रामुख्याने किचन मध्ये ठेवले जाते. म्हणजे फ्रिज ठेवण्यासाठी निश्चित अशा जागेची निवड केली जात नाही. ज्या जागेमध्ये फ्रिज व्यवस्थित मावेल किंवा ते व्यवस्थित बसेल अशा ठिकाणी फ्रिज ठेवले जाते. यामध्ये फ्रीज ठेवताना तुम्ही फ्रीज आणि भिंतीतील अंतर किती ठेवता हे खूप महत्त्वाचे आहे.

कारण या अंतरावर तुमचे वीज बिलाचा प्रश्न अवलंबून आहे. यावर तज्ञांचे मत पाहिलं तर त्यांच्या मते फ्रिज आणि भिंत यामध्ये सहा ते दहा इंचाचे अंतर असणे गरजेचे आहे. कारण फ्रिजला आतून कूल अर्थात थंड राहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व अशा वेळी जर फ्रिजच्या अवतीभवती खेळती हवा असेल तर त्याला आतून थंड होण्यासाठी खूप मदत मिळते.

परंतु फ्रिज जर भिंतीला अगदी खेटून ठेवले तर मोकळा स्पेस मिळत नाही व हवा खेळती राहत नसल्यामुळे आतून थंड होण्यासाठी जास्त विजेचा वापर होतो. तसेच दुसऱ्या काही छोट्या गोष्टींचा विचार केला तर यामध्ये आपण बऱ्याचदा उगीचच काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतो व फ्रिजची जागा संपूर्ण भरून टाकतो. यामुळे देखील बाहेरील हवा फ्रीजला व्यवस्थित मिळत नाही व हवा खेळती न राहिल्यामुळे फ्रीज थंड व्हायला खूप वेळ लागतो.

त्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही विजेचा वाराल तेव्हा फ्रीजमध्ये जास्त वस्तू न ठेवता त्यामध्ये काही जागा मोकळी असू द्यावी. अनावश्यक गोष्टींचा त्यामध्ये साठा न करता महत्त्वाच्या अन्नाचा साठा त्या ठिकाणी करावा. फ्रीजवर काही अनावश्यक सामान आपण ठेवतो ते देखील ठेवू नये. तसेच आपण प्लास्टिक कव्हर फ्रीजला टाकतो. परंतु ते कव्हर टाकताना ते घट्ट असू नये. जर असे कव्हर घट्ट राहिले तर फ्रिजमध्ये उष्णता निर्माण होण्याची शक्यता असते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फ्रिज परत परत उघडू नये. जर असे केले तर विजेचे बिल जास्त येण्याच्या संभव असतो. त्यामुळे विज बिल जर तुम्हाला कमीत कमी ठेवायचे असेल तर फ्रीज व भिंतीमधील अंतर 6 ते 10 इंच असणे गरजेचे आहे व यामध्ये फार जास्त वस्तू भरून न ठेवता कमीत कमी वस्तू ठेवाव्यात त्यामुळे कुलिंग करण्यासाठी जास्त विजेची गरज भासत नाही. त्यामुळे विजेचा वापर कमी होतो व विज बिल कमी येते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts