Fire-Boltt Marshal : भारतीय बाजारात स्मार्टफोनसोबतच इतर स्मार्ट गॅजेट्सची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील काही वर्षामध्ये ग्राहक नियमित वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉचला सर्वात जास्त पसंती देत आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी पाहताना टेक कंपन्या स्मार्टवॉच सादर करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणेज या सेगमेंटमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या स्मार्टवॉचची मागणी झपाट्याने वाढत आहे.
अशातच नुकतेच Fire-Boltt Marshal हे स्मार्टवॉच लाँच झाले आहे. जे तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगसह कमी किमतीत खरेदी करता येईल. यात तुम्हाला गोलाकार डायलसह 1.43-इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. शिवाय यामध्ये कंपनीकडून अनेक आरोग्य सेन्सर देण्यात आले आहेत. जाणून घ्या फीचर्स आणि किंमत.
जाणून घ्या Fire-Boltt Marshal चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
कंपनीकडून या स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंच HD डिस्प्ले देण्यात येत आहे. या स्मार्टवॉचमध्ये गोलाकार डायल दिला असून त्याचा लूक खूप प्रीमियम मिळत आहे. उत्तम कार्य आणि अनुभवासाठी यात वापरकर्त्यांसाठी दोन पुश बटणे दिली आहेत. कंपनी यामध्ये ब्लूटूथ कॉलिंगसाठी बिल्ट-इन माइक आणि स्पीकर देत आहे.
यात तुम्हाला व्हॉईस असिस्टंट मिळेल. फायर-बोल्टचे नवीन स्मार्टवॉच अनेक आरोग्य आणि फिटनेस सेन्सर्सने सुसज्ज असेल. यात तुम्हाला SpO2 सेन्सर सोबत हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटरिंग मिळतील. कंपनीकडून या स्मार्टवॉचमध्ये 123 स्पोर्ट्स मोड दिली आहेत.
वापरकर्त्यांना यात 400mAh बॅटरी मिळत आहे. फायर-बोल्ट मार्शलच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला अनेक स्मार्टवॉच चेहरे, कॅल्क्युलेटर, इन-बिल्ट गेम, स्मार्ट सूचना आणि हवामान अपडेटसह संगीत आणि कॅमेरा नियंत्रण मिळेल. नुकतेच कंपनीकडून भारतीय बाजारात फायर-बोल्ट एमराल्ड लाँच करण्यात आले आहे.
हे स्मार्टवॉच 1.09 इंच डिस्प्लेने सुसज्ज असून ते विशिष्ट डायमंड-कट काचेच्या डिझाइनसह धातूचा पट्टा सह येते. ब्लूटूथ कॉलिंगसह याची बॅटरी 5 दिवसांची आहे. किमतीचा विचार केला तर या स्मार्टवॉचची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. जे तुम्हाला Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून सहज खरेदी करता येईल.