टेक्नोलाॅजी

Flipkart sale : कमी पैश्यात iPhone खरेदी करण्याची मोठी संधी, फ्लिपकार्ट सेल सुरू; लवकर सर्व माहिती समजून घ्या

Flipkart sale : ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर (Online shopping website Flipkart) एंड ऑफ सीझन सेल (End of season sale) सुरू झाला आहे. हा सेल ११ जून ते १७ जून या कालावधीत चालणार आहे.

यावेळी, कपड्यांपासून शूज आणि स्मार्टफोनपर्यंत (clothes to shoes and smartphones), तुम्ही मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. येथे आम्ही तुम्हाला सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या ५ सर्वोत्तम डील्सबद्दल सांगत आहोत.

Apple iPhone 12 (12 हजारांची सूट)

12,000 रुपयांच्या सवलतीनंतर तुम्ही Apple iPhone 12 स्मार्टफोन Rs 53,999 मध्ये खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 64 GB वेरिएंटची आहे. फोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले, 12MP + 12MP ड्युअल रीअर कॅमेरा, 12MP फ्रंट कॅमेरा, A14 बायोनिक चिप, आणि IP68 वॉटर रेझिस्टंट रेटिंग सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Samsung Galaxy F23 5G (8 हजारांची सूट)

हा सॅमसंग स्मार्टफोन 8,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 15,999 रुपयांना खरेदी करता येईल. फोनमध्ये 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेज मिळेल. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.6-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले, 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा, 5000mAh लिथियम-आयन बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे.

POCO C31 (3500 ची सूट)

Poco स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 8,499 रुपयांना विकला जात आहे. या फोनवर ३५०० रुपयांची सूट आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. यात 13MP + 2MP + 2MP मागील कॅमेरा, 5MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.

vivo T1 5G (8 हजारांची सूट)

Vivo T1 स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात 50MP चा प्राइमरी रियर कॅमेरा आहे. यासोबत 2MP + 2MP चे दोन सेन्सर आहेत. हा फोन 19,990 रुपयांना खरेदी करता येईल.

इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB RAM, 128GB स्टोरेज, 6.58-इंच फुल एचडी + डिस्प्ले, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts