Galaxy Watch 6 Series : सॅमसंगने आता आपले नवीन स्मार्ट वॉच लाँच केले आहे. कंपनीच्या नवीन वॉचमध्ये AFib मॉनिटर्स दिली आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला त्यांच्या हृदयाच्या गतीतील असामान्य बदल त्वरित ओळखता येतील. कंपनीने आता Galaxy Watch 6 Series लाँच केली आहे.
जे तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येईल. कंपनीने नवीन स्मार्टवॉच मॉडेल्समध्ये मल्टिपल फिटनेस ट्रॅकर्स दिले आहेत, त्यामुळे वापरकर्त्याच्या हृदय गती, ऑक्सिजन ट्रॅकिंग आणि झोपेचे निरीक्षण केले जाईल.
नवीनतम Galaxy Watch Series 6 मॉडेल स्लिम बेझल्स देण्यात आली आहेत, तसेच क्लासिक मॉडेल्समध्ये फंक्शनल रोटेटिंग बेझल्स कंपनीकडून देण्यात आली आहेत जे अॅप्स आणि विजेट्समध्ये स्विच करण्यासाठी तसेच नेव्हिगेशन सुलभ करण्यासाठी फिरतात. त्याशिवाय या नवीन घड्याळात, कंपनीचे लक्ष प्रगत स्लीप ट्रॅकिंगवर असून यात रक्तदाब मॉनिटरिंगसारख्या प्रगत फीचर्सचा समावेश केला आहे. नवीन घड्याळ LTE, ब्लूटूथ 5.3, Wi-Fi 2, NFC आणि GPS कनेक्टिव्हिटीसह येते.
वैशिष्ट्ये
Samsung ची नवीन Galaxy Watch 6 Series कंपनीच्या इन-हाउस Exynos W930 प्रोसेसरद्वारे समर्थित असून स्टोरेजचा विचार केला तर 2GB RAM सह 16GB अंगभूत स्टोरेज ऑफर करते. या मॉडेल्समध्ये Sapphire Crystal AMOLED पॅनल्स दिले आहेत. ऑलवेज ऑन डिस्प्ले (AOD) वैशिष्ट्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या घड्याळाच्या 40mm आकाराच्या बेस मॉडेलमध्ये 1.3-इंच डिस्प्ले आणि 44mm मॉडेलमध्ये 1.5-इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. तर गॅलेक्सी वॉच 6 क्लासिकच्या बेस मॉडेलमध्ये 1.3-इंचाचा डिस्प्ले पॅनल तसेच 47 मिमी मॉडेलमध्ये 1.5-इंचाचा डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे.
कंपनीच्या दोन्ही नवीन स्मार्टवॉच मॉडेल्समध्ये मल्टिपल फिटनेस ट्रॅकर्स दिले आहेत, ज्यामुळे हृदय गती, ऑक्सिजन ट्रॅकिंग आणि झोपेचे निरीक्षण केले जाईल. नवीन गॅलेक्सी वॉच 6 सीरीजमध्ये कंपनीने स्लीप कोचिंग फीचरचा समावेश केला आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांना चांगली झोप येण्यास मदत होईल. यात वैयक्तिकृत फिटनेस कोचिंग शिवाय, वापरकर्त्यांना वैयक्तिक हृदय गती झोन मोजण्याशी संबंधित कार्ये देण्यात आली आहेत.
कंपनीने नवीन वॉचमध्ये AFib मॉनिटर्स दिली आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला त्यांच्या हृदयाच्या गतीतील असामान्य बदल त्वरित ओळखण्यास सक्षम असतील. अशा प्रकारे, हृदयविकाराच्या बाबतीत, हे वॉच ताबडतोब अलर्ट करेल. सॅमसंग गॅलेक्सी वॉच 6 सिरीजच्या दोन्ही मॉडेल्समध्ये ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आणि मासिक पाळी अंदाज फीचर्स दिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्टवॉच मॉडेल Android 10 आणि त्यावरील आवृत्तीवर चालणाऱ्या सर्व Android डिव्हाइसेसशी सुसंगत असणार आहेत.
बॅटरी बॅकअप
याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही घड्याळांच्या लहान आणि मोठ्या स्क्रीन आकाराच्या मॉडेलमध्ये अनुक्रमे 400mAh आणि 400mAh बॅटरी दिली आहे. या वेअरेबल्सना AOD वैशिष्ट्य चालू असताना 30 तासांपर्यंत आणि AOD वैशिष्ट्य बंद केल्यानंतर 40 तासांपर्यंत मजबूत बॅकअप मिळेल, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. ते Google च्या WearOS वर आधारित OneUI 5 Watch सॉफ्टवेअरवर काम करेल तसेच WPC-आधारित वायरलेस जलद चार्जिंग मिळवतात. कंपनीने 5ATM आणि IP68 रेटिंगसह नवीन मॉडेल बाजारात आणले आहे.