Instagram : इंस्टाग्राम हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाणारे अँप आहे. याच्या युजर्सची संख्या ही मोठी आहे. मात्र सर्वत्र AI हे सध्या चर्चेमध्ये असलेले तंत्रज्ञान आहे. एका अहवालानुसार, इंस्टाग्राम हे त्याच्या वापरकर्त्यांसाठी AI चॅटबोट हे फिचर आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर.
दरम्यान, AI चॅटबोटद्वारे वापरकर्ता चॅटबॉट्सचे लिंग, वय आणि इतर माहिती प्रायव्हेट करण्याची मुभा देऊ शकते. अहवालात म्हटले आहे की चॅटबॉट खाजगी केल्यानंतर, वापरकर्ते त्याचे नाव देऊ शकतात, त्याला अवतार देऊ शकतात आणि चॅट विंडोद्वारे त्याच्याशी बोलूसुद्धा शकतात.
दरम्यान, कंपनीने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. याचा वापर हा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि स्पॅम कन्टेन्ट फिल्टर करण्यासाठी चॅटबॉट्सचा वापर केला जाऊ शकतो.
दरम्यान, या वर्षी सप्टेंबरमध्ये, मेटा ने कनेक्ट लॉन्च इव्हेंट दरम्यान त्याचा AI असिस्टेंट लाँच केला होता. Meta AI नावाचा हा AI असिस्टंट लवकरच WhatsApp, Instagram आणि Facebook वर उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. Meta AI हा एक नवीन असिस्टेंट आहे ज्याशी तुम्ही संवाद साधू शकता जसे की वैयक्तिक व्यक्ती WhatsApp, Messenger, Instagram वर उपलब्ध आहे.
दरम्यान, लवकरच Ray-Ban Meta स्मार्ट ग्लासेस आणि Quest 3 वर सुद्धा येत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Meta AI व्यतिरिक्त, कंपनीने असेही म्हटले आहे की त्यांनी वेगवेगळ्या कैरेक्टरचे तसेच बैकग्राउंड स्टोरीसह 28 इतर AI चॅटबॉट्स सादर केले आहेत. या चॅटबॉट्सचे सोशल मीडियावर प्रोफाईलही असतील.