टेक्नोलाॅजी

Jio, BSNL, Vi ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! आता ग्राहकांना मिळणार मोफत डाटा, वाचा सविस्तर

Mobile Recharge Plan : भारतात जिओ, बीएसएनएल, वोडाफोन, आयडिया या सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीचे ग्राहक संपूर्ण देशात आहेत. ही अल्पावधीतच लोकप्रिय बनलेली टेलिकॉम कंपनी आहे. जेव्हा रिलायन्स जिओ बाजारात आले त्यावेळी त्यांनी ग्राहकांना मोफत रिचार्ज ऑफर केले होते. त्यांनी सुरुवातीला मोफत इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा ग्राहकांनी पुरवली यामुळे त्यांचा एक मोठा ग्राहक वर्ग तयार झाला आहे.

यामुळे मात्र टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठे कॉम्पिटिशन वाढले आहे. यामुळे आता टेलिकॉम कंपन्या स्वस्त रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. दरम्यान आता आपण जिओ, बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया यांच्या अशा रिचार्ज प्लॅन बाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये ग्राहकांना मोफत अतिरिक्त डाटा मिळत आहे. यामुळे जर तुम्हीही जिओ, बीएसएनएल किंवा वोडाफोन-आयडियाचे कस्टमर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे.

BSNL देणार 3GB अतिरिक्त डाटा

भारत सरकारची कंपनी BSNL आपल्या वापरकर्त्यांना 3GB अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. जर तुम्ही ही बीएसएनएलचे ग्राहक असाल तर तुम्हाला देखील या अतिरिक्त डेटाची ऑफर मिळणार आहे. यासाठी तुम्हाला BSNL कडून अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत ज्यात Rs 251, Rs 299, Rs 398, Rs 666, Rs 499 आणि Rs 599 चे प्लान आहेत.

पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या अधिकृत अॅपवरून रिचार्ज करावे लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही फोन पे गुगल पे यांसारख्या युपीआय पेमेंट एप्लीकेशन मधून रिचार्ज केला तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्हाला या मोफत डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला बीएसएनएलच्या अधिकृत एप्लीकेशन मधून अर्थातच सेल्फ केअर एप्लीकेशन मधून रिचार्ज करावा लागणार आहे.

Jio देणार सहा जीबी मोफत डेटा

जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन लॉन्च करत असते. दरम्यान जिओने असे दोन प्लॅन लॉन्च केले आहेत ज्यामध्ये ग्राहकांना रेगुलर प्लॅन सोबतच मोफत डाटा देखील दिला जात आहे. Jio 219 रुपये आणि 399 रुपयांचे असे दोन प्लॅन ऑफर करते ज्यात ग्राहकांना मोफत डाटा मिळतो. यात 219 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता मिळते. तसेच दररोज 3GB डेटा मिळतो.

याशिवाय, तुम्हाला अतिरिक्त 2GB डेटा फ्री दिला जातो. याशिवाय, कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा मिळतो आणि यासोबत 6GB अतिरिक्त फ्री डेटा दिला जातो. विशेष म्हणजे या रिचार्ज प्लॅन्ससोबत तुम्ही Jio TV आणि Jio Cinema मोफत वापरू शकणार आहात. निश्चितच जर तुम्ही जिओ युजर असाल तर हे प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या प्लॅनने रिचार्ज केल्यास तुम्हाला रेगुलर डेटा सोबतच अतिरिक्त फ्री डेटा देखील मिळणार आहे.

Vi ग्राहकांना मिळणार 5 जीबी मोफत डेटा

जिओ आणि बीएसएनएल या टेलिकॉम कंपन्यांप्रमाणेच वोडाफोन-आयडिया टेलिकॉम कंपनी देखील आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन लॉन्च करत असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोफत डेटा देणारे प्लॅन देखील Vi कंपनीने लॉन्च केले आहेत. 299 आणि 359 रुपयांचे दोन रिचार्ज पॅक असे आहेत, ज्या तुम्हाला रेगुलर रिचार्ज सोबतच मोफत रिचार्जचा देखील लाभ दिला जात आहे.

यातील २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता दिली जाते, यात तुम्हाला 5GB अतिरिक्त डेटा दिला जातो. दुसऱ्या 359 रुपयाच्या प्लॅन बाबत बोलायचं झालं तर यामध्ये 28 दिवसांची वैधता आणि 5 GB अतिरिक्त डेटा उपलब्ध होत आहे. मात्र हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वोडाफोन-आयडियाच्या अधिकृत एप्लीकेशन वरूनच रिचार्ज करावे लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts