OnePlus : जर तुम्हाला कमी किमतीत चांगला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. सध्या Amazon वर सुरु असलेल्या सेलमध्ये वनप्लसचा एक फोन खूप स्वस्त दरात मिळत आहे. या ऑफर मध्ये तुम्ही वनप्लसचा हा जबरदस्त फोन फक्त 18 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.
आम्ही OnePlus Nord CE4 Lite 5G बद्दल बोलत आहोत. हा स्मार्टफोन या वर्षी जून महिन्यात 8GB 128GB व्हेरिएंटसाठी 19,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. हा स्मार्टफोन अजूनही Amazon वर 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर सूचीबद्ध आहे. परंतु, ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना 2,000 रुपयांची झटपट सूट मिळेल.
या सवलतीनंतर, ग्राहक 17,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीवर फोन खरेदी करू शकतील. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन सारख्या ऑफर्सही ग्राहकांना दिल्या जात आहेत.
OnePlus Nord CE 4 Lite 5G फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच फुल-एचडी AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो. OnePlus चा हा स्मार्टफोन Android 14 आधारित OxygenOS 14 कस्टम OS सह येतो.
OnePlus Nord CE 4 Lite 5G मध्ये फोटोग्राफीसाठी 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा आहे. त्याची बॅटरी 5,500mAh आहे आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील येथे उपलब्ध आहे.