Smartphone Under 10K:- ज्या कोणत्याही व्यक्तीला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो तो प्रामुख्याने कमीत कमी पैशांमध्ये उत्तम अशी वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असतो व अशा स्मार्टफोनच्या शोधात असतो.
तसे बघायला गेले तर स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये अशा अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आहेत की त्या कमीत कमी बजेटमध्ये मिळतात व चांगली उत्तम वैशिष्ट्ये देखील आपल्याला अशा स्मार्टफोनमध्ये दिसून येतात. परंतु यामध्ये कोणत्या स्मार्टफोनची निवड करावी याबाबतीत मात्र बऱ्याचदा गोंधळ उडतो किंवा अशी डील आपल्याला कोणत्या ठिकाणी मिळेल व आपल्याला परवडणारी असेल याबाबत आपल्याला व्यवस्थित माहिती मिळत नाही.
या अनुषंगाने जर तुम्हाला देखील उत्तम असा स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे व तुमचा बजेट दहा हजार रुपये असेल तर या बजेटमध्ये देखील बाजारात चांगले स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
जर तुम्ही अमेझॉन या ई कॉमर्स साइटवर गेला तर या ठिकाणी तुम्हाला रेडमी A4 5G, रेडमी 13C 5G आणि पोको M6 5G हे तीन उत्तम फीचर्स असलेले स्मार्टफोन तुम्हाला मिळू शकतील व यावर सध्या मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. या कालावधीमध्ये या स्मार्टफोनच्या किमती कमी करणे व्यतिरिक्त यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत.
दहा हजार रुपये बजेटमधील आहेत हे उत्तम फोन
1- रेडमी A4 5G स्मार्टफोन वर मिळणारी सवलत आणि त्याची किंमत- या स्मार्टफोनचे चार जीबी रॅम+ 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या ॲमेझॉन वर 8,498 किमतीत लिस्टेड म्हणजे सूचीबद्ध आहे.
अमेझॉनवर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला आठ हजार रुपयांची अतिरिक्त बचत करता येऊ शकते. यामध्ये एक्सचेंज ऑफर अंतर्गत जास्तीत जास्त फायदा हा तुम्हाला डिवाइसच्या सध्याची स्थिती आणि मॉडेल कोणता आहे यावर अवलंबून असेल.
रेडमीच्या या स्मार्टफोन मध्ये 6.88 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून ज्याचे रिझोल्युशन 1600×720 पिक्सेल इतके आहे व या फोनमध्ये ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4S Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे व हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर आधारित हायपर ओएस वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 5160mAh बॅटरी दिली असून जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते.
2- रेडमी 13C 5G स्मार्टफोनवर मिळणारी सवलत आणि त्याची किंमत व वैशिष्ट्ये-
या स्मार्टफोनचा चार जीबी रॅम+ 128 जीबी प्रकार 9 हजार 99 रुपयांना सूचिबद्ध आहे. ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवर यावर एक्सचेंज ऑफर उपलब्ध असून या ऑफरअंतर्गत आठ हजार सहाशे रुपयांची अतिरिक्त बचत करणे शक्य आहे.पण तुम्ही जो मोबाईल एक्सचेंज करणार आहात त्याची सध्याची स्थिती आणि मॉडेल कोणते आहे यावर एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळणारा लाभ अवलंबून असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सीटी 6100+5G प्रोसेसर देण्यात आला आहे व यामध्ये 6.74 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे व त्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे व यामध्ये बॅटरी ही 5000mAh क्षमतेची दिली आहे
3- पोको M6 5G स्मार्टफोनवर मिळणारी सवलत तसेच त्याची किंमत व वैशिष्ट्ये- हा स्मार्टफोनचे 4 जीबी रॅम+ 64 जीबी व्हेरिएंट 8499 रुपयांना सूचीबद्ध असून अमेझॉनवर एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला आठ हजार रुपयांच्या अतिरिक्त सवलतीवर मिळू शकतो.
यामध्ये एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असून तुम्हाला या अंतर्गत मिळणारे फायदे तुमच्या सध्याच्या डीव्हाईसच्या सध्याच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून असतो.
या स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून या फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे व हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ प्रोसेसर वर काम करतो.