iPhone 12 : आयफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना आता मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत iPhone 12 खरेदी करता येणार आहे. जो काही कंपनीने दिवसांपूर्वी लाँच केला होता. परंतु हे लक्षात घ्या की संधी फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे.
त्यामुळे लवकरात लवकर हा फोन खरेदी करा. दरम्यान या फोनची मूळ किंमत 59,900 रुपये इतकी आहे. या फोनवर फ्लिपकार्ट आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देत आहे. त्यामुळे तुम्हाला या फोनवर 35000 रुपयांची बचत करता येणार आहे.
फोनवर मिळतेय 6 हजारांची सवलत
कंपनीचा लोकप्रिय iPhone 12 फोन तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर 9% सवलत मिळत आहे. फ्लिपकार्ट फोनचे 64GB स्टोरेज मॉडेल 53,999 रुपयांच्या किमतीत देत आहे. दरम्यान या फोनची मूळ किंमत 59,900 रुपये इतकी आहे. हे लक्षात घ्या की ही ऑफर फोनच्या पर्पल, रेड, व्हाइट आणि ब्लॅक कलर व्हेरियंटवर उपलब्ध आहे.
iPhone 12 वर सिरेमिक शील्डसह 6.1-इंच सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येत असून या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 12-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या A14 बायोनिक प्रोसेसरने सुसज्ज असून यात कंपनीकडून न्यूरल इंजिन प्रोसेसर दिले आहे.
35 हजारांपर्यंत बचत करता येणार
फ्लिपकार्ट आता जुन्या स्मार्टफोनवर 33,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. लक्षात घ्या की या एक्सचेंज बोनसची किंमत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे. तसेच या फोनच्या खरेदीवर बँक ऑफर आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या कार्डने खरेदी केली तर तुम्हाला 2,000 रुपयांची सूट घेता येईल. तुम्हाला बँक आणि एक्सचेंज ऑफर या दोन्हींचा पुरेपूर लाभ घेता आला तर तुम्ही 35,000 रुपयांपर्यंत फोन खरेदी करू शकता.
परंतु दुसर्या अहवालात, iPhone 15 लाँच झाल्यानंतर iPhone 12 बंद होण्याची अपेक्षा आहे कारण Apple कधीही तीन वर्षांपेक्षा जुने iPhone आपल्या स्टोअरमध्ये ठेवत नाही. कंपनी दरवर्षी काही आयफोन्स त्याच्या प्रोडक्शन लाइनअपमधून काढून टाकत असते. तथापि, हे iPhones अजूनही ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असून किंवा नूतनीकरण केलेल्या साइट्सवरून खरेदी करता येतात.