iPhone 13 : सर्वच iPhone च्या किमती खूप जास्त असतात. त्यामुळे अनेकांना तो खरेदी करता येत नाही. परंतु Amazon आणि फ्लिपकार्टवर सतत वेगवेगळ्या ऑफर्स सुरु असतात. ज्याद्वारे तुम्हाला iPhone मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करता येतात.
सध्या अशीच एक शानदार ऑफर फ्लिपकार्टवर मिळत आहे. ज्याचा तुम्हाला लाभ घेऊन iPhone 13 हा फोन अवघ्या 18 हजार रुपयांना खरेदी करता येईल. त्यामुळे तुमची हजरो रुपयांची बचत होईल. या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे.लवकरच iPhone 15 सीरीज लॉन्च करणार आहे. यात iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max आणि iPhone 15 Ultra असतील.
जाणून घ्या iPhone 13 ची किंमत
किमतीचा विचार केला तर Apple च्या iPhone 13 ची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे, परंतु फ्लिपकार्टवर हा फोन तुम्हाला 56,999 रुपयांना खरेदी करता येईल. म्हणजेच यावर तुम्हाला एकूण 12,901 रुपयांची संपूर्ण सवलत मिळेल. इतकेच नाही तर iPhone 13 वर बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे iPhone 13 फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी करता येत आहे. जाणून घेऊयात बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर.
जाणून घ्या iPhone 13 बँक ऑफर
समजा तुम्ही iPhone 13 हा फोन खरेदी करण्यासाठी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला 2,850 रुपयांची सवलत मिळेल, त्यानंतर फोनची किंमत 54,149 रुपये इतकी होते. यानंतर या फोनवर एक एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.
जाणून घ्या एक्सचेंज ऑफर
iPhone 13 वर आता एकूण 36,100 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. समजा तुम्ही तुमच्याकडे असणारा तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला इतकी सवलत मिळेल. परंतु ऑफर घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की 36,100 रुपयांची एक्सचेंज ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल, तर तुमच्यासाठी या फोनची किंमत 18,049 रुपये असणार आहे.