iPhone 14 : इतर स्मार्टफोनपेक्षा iPhone ची किंमत खूप जास्त असते. किंमत जास्त असल्याने iPhone अनेकजण खरेदी करण्याचे टाळतात. परंतु तुम्ही आता कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता. अशी भन्नाट ऑफर तुमच्यासाठी काही दिवस उपलब्ध असणार आहे.
फ्लिपकार्टवर अशी संधी उपलब्ध आहे. येथे तुम्हाला या फोनवर 61,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. परंतु एक्सचेंज ऑफरची किंमत तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे.
12 हजारांनी स्वस्तात मिळतोय फोन
फ्लिपकार्टवर अशी शानदार ऑफर मिळत आहे. किमतीचा विचार केला तर खरंतर, iPhone 14 या ठिकाणी 71,999 रुपयांना उपलब्ध आहे.या फोनची मूळ किंमत 79,900 रुपये इतकी आहे, म्हणजेच तो मूळ किमतीपेक्षा 7901 रुपयांनी कमी किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. परंतु तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता.
इतकेच नाही तर HDFC बँकेकडून खरेदीवर 4000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. म्हणजेच बँक ऑफरनंतर फोनची किंमत केवळ 67,999 रुपये इतकी असणार आहे. फ्लिपकार्ट फोनवर 61,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची किंमत तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे.
जाणून घ्या खासियत
हे लक्षात घ्या की iPhone 14 5G सपोर्टसह तुम्हाला खरेदी करता येईल. यामध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा हा डिस्प्ले सिरेमिक शील्डद्वारे संरक्षित आहे. त्यामध्ये फिंगरप्रिंट प्रतिरोधक कोटिंग दिले असून हा डिस्प्ले 1200 nits पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो. 172 वजनाचा, हा फोन IP68 रेटिंगसह तुम्हाला खरेदी करता येईल.
या फोनबाबत कंपनीचा दावा आहे की 6 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे टिकेल. हा फोन A15 बायोनिक चिपसेट सह येईल. यात फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचे दोन रियर कॅमेरे आणि सेल्फीसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यास 20 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देईल.