iPhone 14 Plus : मागच्या वर्षी लोकप्रिय मोबाईल कंपनी Apple ने भारतीय बाजारासह जागतिक बाजारात iPhone 14 सीरिज लाँच केली होती.
कंपनीने या सीरिजमध्ये iPhone 14 Plus स्मार्टफोन देखील लाँच केला होता. तेव्हा पासूनच हा फोन बाजारात धुमाकूळ घालत आहे. यातच तुम्ही देखील हा फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंट ऑफरसह हा फोन अवघ्या 44 हजारात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात हा फोन कोणत्या ऑफरची मदत घेऊन खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो iPhone 14 Plus वर फ्लिपकार्ट एक भन्नाट ऑफर देत आहे. 89,999 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर 9 टक्के डिस्काउंटसह 80,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याच बरोबर तुम्हाला फोनच्या खरेदीवर 33 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
यासोबतच निवडलेल्या मॉडेलवर 3000 रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, iPhone 14 Plus ची किंमत 44,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून 5 टक्के कॅशबॅकसह खरेदी करता येईल. तसेच, फोन Rs.3,375 EMI पर्यायावर खरेदी केला जाऊ शकतो. त्याच HDFC बँकेच्या डिस्काउंट ऑफरमध्ये 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. iphone 14 Plus च्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी आणि 6 महिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी दिली जात आहे.
iPhone 14 स्मार्टफोन 128 स्टोरेज व्हेरियंटसह येतो. फोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 MP चा डुअल कॅमेरा सेटअप आहे. तर समोर 12MP कॅमेरा सेन्सर देखील उपलब्ध आहे. फोन 6nm आधारित A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो.
हे पण वाचा :- 10 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा ‘ह्या’ मस्त सेडान कार्स ; पहा फोटो