iPhone 14 Plus Offer : भारतीय मार्केटमध्ये Apple स्मार्टफोन कंपनीकडून त्यांचे अनेक महागडे स्मार्टफोन्स सादर केले आहेत. भारतीयांमध्ये आयफोन खरेदी करण्याची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रत्येकाचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न असते मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना खरेदी करता येत नाही.
तुम्हीही कमी किमतीमध्ये नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण iPhone 14 Plus स्मार्टफोन सर्वात मोठी ऑफर देण्यात येत आहे.
iPhone 14 Plus 90 हजारांच्या स्मार्टफोनवर 25 टक्क्यांची मोठी सूट दिली जात आहे. Amazon कडून iPhone 14 Plus व्हेरियंटवर 25 टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. त्यामुळे iPhone 14 Plus खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.
कमी किमतीत iPhone 14 Plus खरेदी करण्याची चांगली संधी
नवीन आयफोन खरेदी करण्याची तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. iPhone 14 Plus ची किंमत 89,900 रुपये आहे. Amazon कडून iPhone 14 Plus वर 25 टक्के सूट देण्यात येत असल्याने हा फोन फक्त 66,999 रुपयांना मिळत आहे.
तसेच iPhone 14 Plus वर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे. iPhone 14 Plus खरेदी करण्यावर 16,700 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. मात्र एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचा स्मार्टफोन चांगल्या स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे.
iPhone 14 Plus ची वैशिष्ट्ये
Apple कंपनीकडून iPhone 14 Plus स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4K व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी उत्तम कॅमेरा देण्यात आला आहे.
क्रॅश डिटेक्शन टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही अपघात झाल्यास आपत्कालीन फोन देखील करू शकता. iPhone 14 Plus मध्ये मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला आहे.