iPhone 15 Price Cut : आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सिरीज लॉन्च होणार आहे. iPhone 16 सिरीज सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणार अशी बातमी समोर आली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात अँपल आयफोनची नवीन सिरीज लॉन्च करत असते. याही वर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोनची 16 सिरीज बाजारात उतरवली जाणार आहे.
दरम्यान आयफोन 16 सिरीज लॉन्च होण्यापूर्वीच आयफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आयफोन 15 च्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट आली आहे. आयफोन 16 बाजारात लॉन्च होण्याआधीच iphone 15 च्या किमतीत कपात करण्यात आली आहे.
यामुळे जर तुम्हीही आयफोन 15 खरेदी करणार असाल तर हा हँडसेट खरेदी करण्यासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. या काळात तुम्ही आयफोन 15 स्वस्तात खरेदी करू शकता.
गेल्या वर्षी लॉन्च झालेला आयफोन 15 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये आयफोन 15 बाजारात उतरवला गेला.
सप्टेंबर 2023 मध्ये हा फोन लॉन्च झाला. या फोनची सुरुवातीची किंमत ही 79 हजार 900 रुपये एवढी होती. आता मात्र हा आयफोन 60 हजार 710 च्या सुरुवातीच्या किमतीत ग्राहकांना उपलब्ध होत आहे.
अर्थातच या हँडसेटच्या किमतीत तब्बल 19 हजार रुपयांची कपात झाली आहे. आयफोन 15 बाबत बोलायचं झालं तर हा हँडसेट तीन स्टोरेज व्हेरिएंट्स मध्ये बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. 128GB, 256 GB आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट मध्ये हा फोन बाजारात उपलब्ध आहे.
पण, आयफोन 15 ॲमेझॉन या शॉपिंग साइटवरचं सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. वास्तविक, आयफोन 15 ची सुरुवातीची किंमत अमेझॉन वर 70 हजार 990 रुपये लिस्ट करण्यात आली आहे.
मात्र या मोबाईलच्या खरेदीवर अमेझॉनवर विशेष आकर्षक डिस्काउंट ऑफर सुरू आहे. या हँडसेटच्या खरेदीवर चार हजार रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट दिला जात आहे.
तसेच एक्सचेंज ऑफरचा देखील ग्राहकांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे हा आयफोन EMI वर मिळतोय. सहा महिने कालावधीसाठी फक्त तीन हजार 191 रुपयांच्या ईएमआयवर हा फोन उपलब्ध होत आहे.