टेक्नोलाॅजी

iPhone 15 Price : मोठी बातमी! लॉन्च होण्यापूर्वी आयफोन 15 च्या किमती झाल्या लीक, किंमत पाहून तुम्हीही कराल खरेदी

iPhone 15 Price : भारतात दिवसेंदिवस आयफोनची क्रेझ वाढत चालली आहे. अनेकांचे आयफोन खरेदी करण्याची स्वप्न असते मात्र किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करता येत नाही. मात्र ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सकडून ऑफर देण्यात येत असतात. त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्हीही आयफोन खरेदी करू शकता.

Apple कंपनीकडून दरवर्षी त्यांच्या फोनची पुढील सिरीज लॉन्च केली जाते. आतापर्यंत Apple कंपनीकडून १४ सिरीजपर्यंत फोन लॉन्च करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आयफोन प्रेमी आयफोन १५ सिरीजची वाट पाहत आहेत.

आता लवकरच Apple कंपनीकडून त्यांची 15 सिरीज लॉन्च केली जाणार आहे. कंपनीकडून त्यांच्या १५ सिरीजमध्ये ४ नवीन आयफोन लॉन्च केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Apple कंपनीच्या आयफोन १५ सिरीज लॉन्च करण्यासाठी अवघ्या दोन महिन्यनपेक्षा कमी कालावधी आहे. मात्र लॉन्च होण्यापूर्वीच आयफोन १५ च्या किमती लीक झाल्या आहेत. मात्र त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मात्र जर तुम्हीही आयफोन १५ खरेदी करण्याचा प्लॅन आखत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता आयफोन १५ च्या किमती लीक झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक त्याच्या किमती सहज पाहू शकतात.

आयफोन १५ च्या लीक झालेल्या किमतीनुसार $ 799 म्हणजेच 65,900 रुपये मध्ये उपलब्ध असेल तसेच iPhone 15 प्लस $ 899 मध्ये उपलब्ध असेल म्हणजेच सुमारे 73,700 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तसेच iPhone 15 प्रो मॉडेल या दोन्ही मॉडेलपेक्षा महाग असणार आहे.

पेरिस्कोपिक लेन्स प्रो मॉडेलमध्ये उपलब्ध असतील

आयफोन १५ च्या प्रो मॉडेल्समध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Apple प्रो मॉडेलच्या iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल कॅमेरा आणि पेरिस्कोपिक लेन्स देऊ शकते. ही सिरीज 6X झूम सह लॉन्च केले जाऊ शकते.

iPhone 14 Pro पेक्षा सुमारे $100 आयफोन १५ प्रो अधिक महाग असू शकतो. आयफोन 15 प्रो मॅक्स आयफोन 14 प्रो मॅक्स पेक्षा सुमारे $ 150 ते $ 200 अधिक महाग मिळू शकतो. ग्राहकांना iPhone 15 Pro $1,099 पेक्षा जास्त तर iPhone 15 Pro Max $1,299 मध्ये मिळू शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts