iPhone 15 Pro Max : Apple चा लवकरच आगामी फोन iPhone 15 Pro Max तुम्हाला धुमाकूळ घालताना दिसणार आहे. जो कंपनीच्या काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या 14 Pro Max पेक्षा खूप वेगळा असणार आहे. यात भन्नाट फीचर्स दिले जाणार आहे.
दरम्यान कंपनी सप्टेंबर महिन्याच्या जवळपास आयफोनची नवीन सीरिज लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यात iPhone 15 Pro Max या फोनचा समावेश असेल. यात 48MP कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसर दिला जाईल.
सोशल मीडियावर एका टिपस्टरने असा दावा केला आहे की iPhone 15 Pro Max मागील वर्षी लॉन्च केलेल्या iPhone 14 Pro Max प्रमाणेच कॅमेरा आकार आणि डिस्प्ले तंत्रज्ञान वापरणार आहे. तसेच जुन्या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की कॅमेरा सेन्सर बदलला जाण्याची शक्यता आहे.
असा असेल कॅमेरा
IMX803 सेन्सरसह 48MP 1/1.28 इंच लेन्स आगामी iPhone 15 Pro Max मध्ये वापरल्या जाणार आहेत. ही लेन्स आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये अगोदरपासूनच देण्यात आली आहे. अशातच सोनी IMX903 चा 1 इंचाचा सेंसर iPhone 15 Pro Max मध्ये वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डिस्प्ले
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, M12 OLED पॅनेल तंत्रज्ञान iPhone 15 Pro Max मध्ये वापरण्यात येईल. तसेच या फोनमध्ये एक उत्कृष्ट गुणवत्तेचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यावर बरीच चाचणी केली गेली आहे.
iPhone 15 Pro Max डिझाईन
रिपोर्ट्सनुसार, iPhone 15 Pro Max ची रचना थोडी वेगळी असेल. आगामी आयफोन सध्याच्या आवृत्तीपेक्षा किंचित स्लिम असण्याची शक्यता आहे.
झूम करता येणार
दरम्यान कंपनीच्या आगामी iPhone 15 Pro Max चा कॅमेरा सेटअप आणि डिझाइन iPhone 14 Pro Max प्रमाणेच असणार आहे. परंतु त्यात काही बदल पाहायला मिळणार आहे, जसे की यावेळी पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स वापरता येईल. यामध्ये 6x ऑप्टिकल झूमची सुविधा दिली जाणार आहे. तसेच कंपनीकडून आगामी फीचर्सबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.