iPhone News : फ्लिपकार्ट बोनान्झा सेलमध्ये (Flipkart Bonanza Sale) iPhone वर उत्तम ऑफर (Offer) आहेत. ग्राहक (customer) प्रमुख बँकांकडून कार्ड आणि ईएमआय (EMI) खरेदीसह अतिरिक्त सवलत देखील घेऊ शकतात.
आयफोन 12 सेलमध्ये 51,299 रुपयांच्या सवलतीच्या दरात विकला जात आहे. हँडसेट A14 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज आहे आणि त्यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये समोर 12MP TrueDepth कॅमेरा आहे.
सेलमध्ये iPhone 13 ची सुरुवातीची किंमत 71,249 रुपये आहे. फ्लिपकार्ट फोनच्या खरेदीवर 19,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
iPhone 12 Pro फ्लिपकार्ट सेलमध्ये 1,09,150 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे.
iPhone 11 सध्या फ्लिपकार्टवर 40,249 रुपयांना उपलब्ध आहे.हा स्मार्टफोन 14,651 रुपयांनी स्वस्त झाला आहे. हँडसेटमध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना HD डिस्प्ले आणि सेल्फीसाठी समोर 12MP कॅमेरा आहे.