टेक्नोलाॅजी

iQOO 7 Neo Pro : कडक फीचर्स आणि दमदार प्रोसेसरसह ‘या’ दिवशी मार्केटमध्ये येणार iQOO चा नवीन फोन; OnePlus 11R ला देणार टक्कर

iQOO 7 Neo Pro : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण आता iQOO आपला नवीन फोन लवकरच लाँच करणार आहे. कंपनी आता शानदार फीचर्ससह iQOO 7 Neo Pro लाँच करणार आहे. जो OnePlus 11R शी स्पर्धा करेल.

कंपनी अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत होती. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हा फोन केवळ 16 मिनिटांत फुल चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीकडून आपल्या आगामी स्मार्टफोनच्या मागील पॅनलचा खुलासा करण्यात आला आहे. यात फ्लॅगशिप चिपसेट उपलब्ध असणार आहे. हे दोन्ही फोन स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीच्या बाबतीत एकमेकांना टक्कर देतील.

असे असेल डिझाइन

iQOO Neo 7 Pro या स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाणार आहे. हा प्रोसेसर आपण यापूर्वी अनेक स्मार्टफोनमध्ये पाहिला असेलच. हे लक्षात घ्या की नुकताच या प्रोसेसरसह OnePlus 11R लाँच केला आहे. या क्वालकॉम प्रोसेसरवर रोजच्या कामासह गेमिंग सहज करता येईल.

कंपनीकडून यात गेमिंगसाठी वेगळी चिप देण्यात आली आहे, त्यामुळे वापरकर्त्यांना गेमिंगचा चांगला अनुभव मिळू शकेल. यात मोशन कंट्रोल फीचर देण्यात येईल, जे गेमर्ससाठी खूप फायदेशीर आहे. हे शानदार फिचर iQOO Neo 7 मध्ये पाहिले आहे, यात 120W चे फास्ट चार्जिंग उपलब्ध असणार आहे. हा फोन केवळ 8 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

किंमत

हा फोन 4 जुलै रोजी लाँच होईल. किमतीबाबत बोलायचे झाले तर आगामी फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, परंतु असा अंदाज आहे की हा फोन 40 हजार रुपयांच्या किंमतीत येईल. स्मार्टफोन Android 13 वर आधारित FunTouch OS 13 वर काम करू शकेल.

यात 50MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तसेच 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळतील. आगामी फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. यामध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts