iQoo 9 SE 5G Offer: जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन 5G फोन खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी IQ चा 9 SE स्मार्टफोन सर्वात बेस्ट पर्याय ठरू शकतो. बाजारात या फोनची आज मोठी मागणी आहे. भन्नाट फीचर्समुळे हा सध्या बाजारात Oppo आणि Vivo ला टक्कर देत आहेत.
कंपनीने हा फोन मागच्या वर्षी लाँच केला होता तेव्हापासूनच या फोनची मोठी मागणी बाजारात दिसून येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे या स्मार्टफोनवर सध्या एक भन्नाट डिस्काउंट ऑफर सुरु झाला आहे ज्याचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अगदी स्वस्तात हा फोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
कंपनीने फोनचे 8 जीबी रॅम मॉडेल 33,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले. कंपनीने आता त्याची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली आहे. किंमतीत कपात केल्यानंतर, व्हेरिएंट 30,990 रुपयांना खरेदी करता येईल. IQ 9 SE दोन रॅम मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
यामध्ये 8GB+128GB आणि 12GB+256GB समाविष्ट आहे. सध्या कंपनीने फक्त 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये स्पेस फ्यूजन आणि सनसेट सिएरा रंगांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन 5G डिव्हाइस आहे. सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोटोग्राफीसाठी यात मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. 13MP वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मोनोक्रोम लेन्ससह 48MP प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.62-इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे. फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 1300 nits पर्यंत आहे. IQ 9 SE क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित कंपनीच्या स्वतःच्या FunTouch OS 12 वर चालतो. हँडसेटमध्ये 4,500 mAh बॅटरी आहे. हे 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन 12 GB रॅम पर्यंत पॅक करतो. यात 256GB अंतर्गत स्टोरेज देखील आहे.
हे पण वाचा :- Bike Finance Plan: काय सांगता ! अवघ्या 25 हजारात घरी आणता येणार 83 kmpl मायलेजसह येणारी Hero HF100