iQoo Neo 7 : स्मार्टफोनचा जसजसा वापर वाढत आहे तसतशी त्याची किंमत देखील वाढत आहे. ज्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन स्मार्टफोन खरेदी करावे लागत आहेत. अशातच जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप कमी पैशात iQoo चा सर्वात विकला जाणारा स्मार्टफोन iQoo Neo 7 खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. यात 64MP कॅमेरा आणि 12GB RAM देण्यात आली आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
जाणून घ्या iQoo Neo 7 किंमत आणि ऑफर
चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने म्हणजेच iQoo ने iQoo Neo 7 चे दोन प्रकार 8GB 128GB आणि 12GB 256GB लाँच केले आहेत. किमतीचा विचार केला तर या फोनची किंमत अनुक्रमे 29,999 आणि 33,999 रुपये इतकी आहे. परंतु या दोन्ही व्हर्जनची किंमत 2,000 रुपयांनी कमी झालेली आहे. तसेच किमतीमध्ये कपात केल्यानंतर, ग्राहकांना 8GB व्हेरिएंट 27,999 रुपयांना आणि 12GB व्हेरिएंट 31,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच हे स्मार्टफोन इंटरस्टेलर ब्लॅक आणि फ्रॉस्ट ब्लू अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
इतकेच नाही तर तुम्हाला बँक ऑफर अंतर्गत अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे. तसेच iQoo.com वरून iQoo Neo 7 खरेदी करणार्या ग्राहकांना ICICI बँक कार्डवर रु. 1,000 झटपट सवलत मिळेल. आता कंपनी नो-कॉस्ट EMI आणि 15-दिवसांची बदली पॉलिसी देत आहे.
जाणून घ्या iQoo निओ 7 चे फीचर्स
कंपनीने iQOO Neo 7 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंच FHD Samsung E5 AMOLED स्क्रीन दिली आहे. ऑक्टा-कोर पॉवरफुल MediaTek Dimensity 8200 SoC चिपसेटद्वारे समर्थित असणारा हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असून हा स्मार्टफोन 8GB 128GB आणि 12GB 256GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो.
Neo 7 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे ज्यामध्ये OIS सह 64MP रियर कॅमेरा, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश केला आहे. या फोनच्या समोर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP कॅमेरा दिला आहे. तर डिव्हाइसला पॉवर करणे ही एक मजबूत 5000mAh ड्युअल-सेल बॅटरी देखील यात तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यात वेगवान 120W फास्ट चार्जिंगसाठी समर्थन आहे हा फोन फक्त 10 मिनिटांत 50% पर्यंत चार्जिंग करण्यास सक्षम आहे.