Jio Airfiber : देशात जिओच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर घेऊन येत असते. ही कंपनी Airtel ला कडवी टक्कर देते. दोन्ही कंपनीच्या 5G सेवा सुरु असून त्यांचे प्लनही खूप आकर्षक आहेत.
अशातच आता पुन्हा एकदा या कंपन्यांची टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. कारण लवकरच जिओ Jio Airfiber लाँच करणार आहे. जे लाँचनंतर Airtel ला टक्कर देणार आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या प्लॅनची किंमत Airtel च्या तुलनेत कमी आहे.
जाणून घ्या काय आहे एअर फायबर
जिओचे डायरेक्ट एअर फायबर हे नवीन तंत्रज्ञान असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ऑप्टिकल फायबरची गरज पडत नाही. शिवाय यात एक रिसीव्हर मिळेल ज्यात 5G सिम असणार आहे. यालाच तुमच्या वाय-फायसह कनेक्ट करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत, कंपनीच्या वापरकर्त्यांना 1Gbps पर्यंत वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट सेवा मिळणार आहे. इतकेच नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे डिव्हाइस वायर किंवा वायरशिवाय वापरू शकता.
किती असेल किंमत (अपेक्षित):
माध्यमांच्या वृत्तानुसार, कंपनीकडून आपला AirFiber प्लॅन Airtel पेक्षा 20 टक्के कमी किमतीत लॉन्च करण्यात येईल. त्यामुळे त्याची मासिक किंमत एकूण 599 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सहा महिन्यांचा प्लॅन 3650 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच, JioCinema सह अनेक अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन Jio देऊ शकते.
केव्हा होणार सुरू
कंपनीकडून पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 28 ऑगस्ट 2023 रोजी Jio Airfiber लाँच केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दिवशी रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून या बैठकीत Jio AirFiber ची घोषणा केली जाईल. दरम्यान, जिओचा हा प्लॅन लाँच झाल्यानंतर तो एअरटेलच्या प्लॅनला कडवी टक्कर देताना आपल्याला पाहायला मिळेल.
जाणून घ्या एअरटेल एअरफायबरची किंमत:
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एअरटेल एक्स्ट्रीम एअरफायबर दिल्ली आणि मुंबईमध्ये लॉन्च केला आहे. तर त्याची सुरुवातीची मासिक किंमत 799 रुपये इतकी आहे. कंपनीकडून सहा महिन्यांचा प्लॅन 4,435 रुपयांचा उपलब्ध करून देण्यात आला आहे.