टेक्नोलाॅजी

Jio Airfiber : रिलायन्सची मोठी घोषणा! Jio AirFiber लवकरच होणार लॉन्च, आता केबलशिवाय मिळणार हाय स्पीड इंटरनेट

Jio Airfiber : रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या खूप आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी विविध ऑफर घेऊन येत असते. मार्केटमध्ये ही कंपनी Airtel ला चांगलीच टक्कर देत असते. दोन्ही कंपनीच्या 5G सेवा सुरु असून त्यांचे प्लॅन खूप आकर्षक आहेत.

लवकरच जिओ Jio Airfiber लाँच करणार आहे. खरंतर हे कंपनीचे डायरेक्ट एअर फायबर हे नवीन तंत्रज्ञान आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये ऑप्टिकल फायबरची गरज पडत नाही. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली यामध्ये त्यांनी एअर फायबरची घोषणा केली आहे.

लाँच तारीख

मुकेश अंबानी यांनी Air Fiber ची घोषणा केली आहे. त्याशिवाय त्यांनी प्रक्षेपण तारीख जाहीर केली आहे. एअर फायबर 19 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. हे कंपनीचे गेम चेंजर उत्पादन असेल जे वापरकर्त्यांना 5G सुविधा प्रदान करण्यात यशस्वी होईल.

दररोज 150,000 कनेक्शन

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान, मुकेश अंबानी यांच्याकडून एअर फायबरची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी असे सांगितले आहे की त्यात दररोज 150,000 कनेक्शन असेल. अशा स्थितीत देशभरात त्याचा संपर्क वाढवण्यासाठी किती वेगाने काम केले जाणार आहे.

जाणून घ्या फायदे

Jio Airfiber च्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर हाय स्पीड 5G सुविधा याद्वारे उपलब्ध होईल. हे कॉम्पॅक्ट डिव्हाईस 1000 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या परिसरात वाय-फाय कनेक्टिव्हिटी देईल. डिव्हाइसद्वारे सुविधा मिळविण्यासाठी कोणत्याही केबलची गरज नाही हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ती वायरलेस कनेक्टिव्हिटी असणार आहे.

जाणून घ्या जिओ एअरफायबरची किंमत

वायरलेस सिंगल-डिव्हाइस सोल्यूशन म्हणून येणारे JioFiber लाखो वापरकर्त्यांपर्यंत त्याची सुविधा वाढवण्यास सक्षम असणार आहे. हे 19 सप्टेंबर रोजी भारतात लॉन्च होऊ शकते. परंतु त्याची किंमत किती असू शकते, याबाबत अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही. जर लीकवर विश्वास ठेवायचा झाला तर, त्याची किंमत 699 रुपये आणि रु. 999 पासून सुरू होईल. JioFiber प्लॅन OTT लाभांसह 150mbps ऑफर करणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts