Jio Netflix Plan : देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे असंख्य ग्राहक आहेत. कंपनी आपल्या लाखो ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. यातील काही रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांना टक्कर देत असतात.
किमतीचा विचार करायचा झाला तर जिओच्या काही रिचार्ज प्लॅनच्या किमती खूप जास्त असतात तर काही रिचार्ज प्लॅनच्या किमती कमी असतात. या कंपनीकडे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजेनुसार रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. कंपनीच्या काही प्लॅनमध्ये मोफत NetFlix सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
सर्वात अगोदर लक्षात घ्या की कंपनीकडून जिओच्या पोस्टपेड आणि जिओ फायबर प्लॅनसह नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनची ऑफर देण्यात येत आहे, ती प्रथमच मोबाइल प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन देत आहे. कोणत्या प्लॅनमध्ये मिळत आहे नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन जाणून घ्या.
रिलायन्स जिओचा 1,099 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या या 1,099 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 84 दिवसांची वैधता मिळत आहे. यात कंपनीच्या ग्राहकांसाठी नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीच्या या धमाकेदार प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळत आहे. ज्यात तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलचा लाभ मिळत आहे.
रिलायन्स जिओचा 1,499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या 1,499 रुपयांच्या या नवीन प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मिळेल. या प्लॅन अंतर्गत कंपनीचे ग्राहक मोबाईल किंवा टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहू शकतात. परंतु या प्लॅनमधील फरक असा आहे की या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळत आहे. वास्तविक देशात नेटफ्लिक्सचा मूळ प्लॅन 199 रुपयांचा आहे, जो तुम्हाला स्वतंत्रपणे खरेदी करावा लागतो.
इतकेच नाही तर तुम्हाला इतर अनेक रिचार्ज प्लॅन्स पाहायला मिळतील. जर तुम्हाला जास्त डेटा असणारा रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल, तर तुम्हाला अशा अनेक ऑफर्ससह योजना पाहायला मिळतील ज्याचा तुम्ही रिचार्ज करता येईल. या पूर्वी तुम्ही कंपनीच्या अधिकृत साइटला भेट देऊन रिचार्ज प्लॅन पाहू शकता.