टेक्नोलाॅजी

Jio New Year Offer: नवीन वर्षात जिओच्या ‘या’ रिचार्ज प्लानवर मिळेल 24 दिवसांची अतिरिक्त ऑफर! दिवसाचा खर्च 7 रुपये

Jio New Year Offer:- भारतातील अग्रगण्य असलेल्या टेलिकॉम कंपनीचा विचार केला तर यामध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय यासारख्या कंपन्या असून यामध्ये रिलायन्स जिओ ही ग्राहकांच्या आवडीची आणि भारतामध्ये सर्वात जास्त ग्राहक असलेली कंपनी आहे.

रिलायन्स जिओच्या माध्यमातून ग्राहकांसाठी अनेक स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन  देण्यात आले असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडतील असे प्लान असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिलायन्स जिओचे ग्राहक भारतामध्ये आहेत. कायम ग्राहकांसाठी रिलायन्स जिओच्या माध्यमातून अनेक ऑफर देण्यात येतात.

तसेच प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जबरदस्त ऑफर रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी आणत असते. अगदी याच पद्धतीने यावर्षी देखील रिलायन्स जिओने वर्षाच्या अखेरीस ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली असून 2999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर आधारित आहे. नेमकी रिलायन्स जिओने काय ऑफर आणली आहे यासंबंधीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 वार्षिक प्लान वर रिलायन्स जिओने आणली जबरदस्त ऑफर

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील रिलायन्स जिओने 2999 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर एक जबरदस्त ऑफर आणली असून त्यानुसार आता 24 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर ग्राहकांना या प्लॅनवर जिओने देऊ केली आहे. ही ऑफर जिओने न्यू इयर ऑफर अंतर्गत उपलब्ध केली असून या वार्षिक प्लानचा एका दिवसाचा खर्च आता 8.21 रुपयांवरून 7.70 रुपयांपर्यंत कमी होणार आहे.

 2999 रुपयांचा प्लॅन काय आहे कोणत्या आहे त्याचे फायदे?

जिओचा हा 2999 रुपयांचा वार्षिक प्रीपेड रिचार्ज प्लान असून या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजेच एक वर्षाचे आहे. परंतु आता या न्यू इयर ऑफरच्या माध्यमातून या रिचार्ज प्लान वर 24 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार आहे. तुम्ही एकदा 2999 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर वापरकर्त्याला 365 दिवसांऐवजी 389 दिवसांची वैधता कालावधी यामध्ये मिळणार आहे.

म्हणजेच एकंदरीत बारा महिन्याच्या या रिचार्ज प्लान मध्ये तुम्ही 13 महिने याचा फायदा घेऊ शकणार आहात. जर या प्लॅनचे इतर फायदे पाहिले तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाला 2.5 जीबी डेटा मिळतो. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी जर जिओची 5G सेवा उपलब्ध असेल तर तुम्हाला या प्लॅनवर ही 5G सेवा देखील उपलब्ध असणार आहे.

वार्षिक डेटाचा विचार केला तर तुम्हाला एका वर्षात सुमारे 912.5 जीबी डेटा मिळणार असून जर तुमचा डेली इंटरनेट डेटा संपला तर त्याचा स्पीड कमी होऊन तो 64Kbps इतका होईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सेवा उपलब्ध आहे. तसेच जिओ सिनेमा,

जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड सारख्या जिओ एप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देण्यात येते. ही ऑफर 20 डिसेंबर 2023 पासून उपलब्ध करण्यात आलेली आहे. परंतु अजून किती दिवस या योजनेचा फायदा ग्राहकांना घेता येणार याबाबत मात्र कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts