Jio Offers : तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी सध्या कंपनीने एक भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी तब्बल संपूर्ण एक महिना फ्री डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 7000070000 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर जर तुम्ही इच्छित असाल तर तुम्ही 399 आणि 699 रुपयांचे रिचार्ज करू शकतात. पण ही ऑफर एका महिन्यासाठी मोफत आहे.
हा प्लॅन 399 रुपयांचा आहे. यामध्ये घरातील तीन सदस्य जोडता येतील. प्रत्येक सदस्यानुसार 99 रुपये वेगळे भरावे लागतील. या प्लानमध्ये 75 जीबी डेटा दिला जाईल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजिंगची ऑफर दिली जात आहे. या प्लॅनमध्ये निवडक लोकांची सिक्योरिटी डिपॉजिट द्यावी लागेल. ही योजना 4 सदस्यांसह करांसह सुमारे 694 रुपयांची आहे.
या प्लॅनमध्ये 100 GB डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगही देण्यात येत आहे. यामध्ये घरातील 4 सदस्यही जोडता येतील. यासोबतच या प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शनही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून स्वतंत्रपणे 99 रुपये आकारले जातील. एकूण 4 सदस्यांसह हा प्लॅन सुमारे 1196 रुपयांचा असेल.
टीप – जिओचे हे दोन्ही प्लॅन पहिल्या महिन्यासाठी मोफत असतील. हा पोस्टपेड प्लॅन असल्याची माहिती आहे. या प्रकरणात, त्यांचे बिल महिन्याच्या शेवटी येईल. यासोबतच या योजनेत करही भरावा लागणार आहे. याशिवाय पहिल्या महिन्यात 500 रुपयांची सिक्योरिटी डिपॉजिट भरावी लागेल.
हे पण वाचा :- Vastu Tips For Money : आजच घराच्या ‘या’ दिशेला ठेवा मोराची पिसे, पडणार पैशांचा पाऊस, कसं ते जाणून घ्या