Jio Prepaid Recharge Plan : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक कंपनीने काही रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्याचा लाभ तुम्ही घेतला तर तुम्हाला 84 दिवस मोफत कॉलिंगसह डेटाचा लाभ घेता येणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या प्लॅनची किंमतही खूप कमी आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Klout, Jio Cinema चे मोफत सब्सक्रिप्शनही मिळेल.जास्त डेटाची गरज असणाऱ्यांसाठी हा प्लॅन फायद्याचा आहे.
रिलायन्स जिओचा 155 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
किमतीचा विचार केला तर रिलायन्स Jio च्या या प्लॅनची किंमत 155 रुपये इतकी आहे. या प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, याचाच अर्थ तुम्ही जवळपास महिनाभर जिओचा हा रिचार्ज प्लॅन वापरू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळत आहे.
तसेच तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण 2GB डेटा मिळत आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे ही डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. यात तुम्हाला एकूण 300 मोफत एसएमएस देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना Jio TV, Jio Klout, Jio Cinema चे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. ज्यांना जास्त इंटरनेट डेटाची गरज पडत नाही, त्यांच्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीचा हा प्लॅन खूप फायदेशीर ठरू शकतो. तसेच तुम्हाला कॉलिंगसाठी कंपनीचा हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
रिलायन्स जिओचा 395 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओ कंपनीचा हा प्लॅन एकूण 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनीकडून सर्व नेटवर्कवर बोलण्यासाठी प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 6 जीबी डेटाही देण्यात येत आहे.
या रिचार्ज प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देण्यात येतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Jio TV, Jio Klout, Jio Cinema चे मोफत सब्सक्रिप्शन सुद्धा देण्यात येत आहे. तसेच हा डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो.