Jio recharge plan : रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कंपनी सतत अनेक रिचार्जे प्लॅन आणत असते, ज्याचा ग्राहकांना खूप मोठा फायदा होतो. कंपनी ग्राहकांच्या बजेटनुसार प्लॅनच्या किमती आणि फायदे ठरवत असते.
त्यामुळे कंपनी इतर टेलिकॉम कंपन्यांना सतत टक्कर देत असते. असाच एकंपनीने रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्याची किंमत बजेटमध्येही आहे आणि त्यात भन्नाट फायदेही मिळत आहेत. तुम्ही एकदा हा रिचार्ज केला की तुम्हाला 90 दिवस रिचार्ज करावा लागणार नाही.
कंपनीचा 749 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता उपलब्ध असणार आहे.या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. त्यानुसार, प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 180 GB होईल. पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. त्याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देत असून कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन अनेक उत्तम अतिरिक्त फायदे देत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Jio TV आणि Jio Cinema चा मोफत प्रवेश मिळत आहे.
पहा इतर कंपन्यांचे प्लॅन
एअरटेलचा 779 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1.5 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा एकूण 90 दिवसांसह येतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी 5G नेटवर्क क्षेत्रात राहत असणाऱ्या युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. तसेच या प्लॅनमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस दिले जात आहेत. कंपनीचा हा प्लॅन विंक म्युझिकच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो.
Vodafone-Idea चा 903 रुपयांचा प्लॅन
कंपनी त्यांच्या वापरकर्त्यांना 5G कनेक्टिव्हिटी देत नसल्याने इंटरनेट स्पीडच्या बाबतीत ते Jio आणि Airtel पेक्षा थोडे मागे आहे. कंपनीचा हा 903 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 90 दिवस चालतो.यामध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळत आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळत आहे. कंपनी या प्लॅनच्या सदस्यांना 90 दिवसांसाठी Sony Liv चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. तसेच यात तुम्हाला Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारखे फायदे मिळतील.