टेक्नोलाॅजी

Jio Recharge Plan : ग्राहकांसाठी जिओची शानदार ऑफर! एक महिना मोफत मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

Jio Recharge Plan : जर तुम्ही देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही एक महिना मोफत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला एक महिनाभर कोणताही रिचार्ज करावा लागणार नाही.

कंपनी सतत असे शानदार आणि ग्राहकांच्या खिशाला परवडतील असे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. त्यामुळे इतर खाजगी कंपन्यांपेक्षा या कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्या जास्त आहे. दरम्यान, काय आहे कंपनीचा हा भन्नाट प्लॅन जाणून घ्या.

हे लक्षात घ्या की रिलायन्स जिओची चाचणी ऑफर 399 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनवर उपलब्ध असेल. विनामूल्य चाचणी पर्याय 30 दिवसांसाठी असून यात तुम्हाला हा प्लॅन सुरू ठेवणार की नाही हे ठरवता येईल. हे लक्षात ठेवा जिओची ही ऑफर फक्त नवीन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 75GB डेटा मिळत आहे. या प्लॅनची मर्यादा संपल्यानंतर, वापरकर्त्यांना 10 रुपये प्रति जीबी डेटा खर्च करावा लागणार आहे. तसेच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसचाही लाभ मिळणार आहे. कंपनीचा हा रिचार्जे प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो.

यात तुम्ही 3 अतिरिक्त सिमचा वापर करू शकता. आनंदाची बाब म्हणजे या प्रत्येक कनेक्शनला 5GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तसेच प्रत्येक कनेक्शन वापरण्यासाठी तुम्हाला 99 रुपये मोजावे लागणार आहेत. यात तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा अॅक्सेस मिळत आहे.

रिलायन्स जिओचा 599 रुपयांचा प्लॅन

या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटाची सुविधा दिली जात आहे. या प्लॅन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह येईल. यात ग्राहकांना दररोज 100 एसएमएस मिळतील. हे लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये तुम्हाला अतिरिक्त सिमची सेवा मिळत नाही. हा प्लॅन Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud सह देखील येतो.

जिओचा 699 रुपयांचा प्लॅन

Jio चा हा प्लॅन 100 GB डेटा सह येतो. प्लॅनची मर्यादा संपल्यानंतर, तुम्हाला 10 रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळणार आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 100 एसएमएस मिळतात. यामध्ये तुम्हाला 3 अतिरिक्त कनेक्शन जोडता येईल. कंपनीचा हा प्लॅन Amazon Prime Video आणि Netflix Basic सह येईल. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर फायदे देखील मिळतील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts