टेक्नोलाॅजी

Jio Recharge Plan : जिओची सर्वोत्तम ऑफर! मिळेल अनलिमिटेड 5G डेटा अन् बरंच काही, किंमत आहे फक्त इतकीच…

Jio Recharge Plan : लवकरच स्वातंत्र्य दिन येत असून हा दिवस साजरा करण्यासाठी जगभरातील अनेक टेक कंपन्या देखील आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर देत आहे. आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जियोने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक खास ऑफर आणली आहे.

जर तुम्ही या प्लॅनचा रिचार्ज केला तर तुम्हाला रिचार्जचे वर्षभर कोणतेही टेन्शन नाही. जर कंपनीच्या या प्लॅनच्या किमतीचा विचार केला तर या प्लॅनची किंमत 2999 रुपये इतकी आहे. जाणून घेऊयात रिलायन्स जियोच्या या प्लॅनबाबत सविस्तर.

आपल्या ग्राहकांसाठी आता रिलायन्स जिओकडून वर्षभरासाठी नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना सतत रिचार्ज करावा लागणार नाही. समजा जर तुम्ही एकदाच हा रिचार्ज केला तर तुम्हाला पुढील 365 दिवस रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही.

दरम्यान, कंपनीकडून ग्राहकांच्या बजेटनुसार वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात येतात. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रिचार्ज प्लॅन करू शकता. तसेच आता रिलायन्स जिओने नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे जो संपूर्ण वर्षभर येतो. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्य तुम्हाला दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग फायदे मिळतील.

जाणून घ्या फायदे

हे लक्षात घ्या की तुम्हाला Jio कडून अनलिमिटेड 5G डेटा देण्यात येत आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला रिचार्ज केला तर तुम्हाला ते खूप महागात पडेल. परंतु जर तुम्ही 2999 रुपयांचा रिचार्ज केल्यास ते 250 रुपयांपेक्षा स्वस्त असू शकेल. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळत आहे. यासोबत तुम्हाला प्रत्येक महिन्याला दररोज 2.5GB इंटरनेट डेटा मिळेल. एकंदरीतच तुम्हाला वर्षभरात 912.5GB इंटरनेट डेटाचा लाभ घेता येईल.

इतकेच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉल तसेच अनलिमिटेड 5G इंटरनेट डेटा मिळत आहे. तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत मिळतील. समजा तुम्ही हा रिचार्ज प्लॅन घेतला तर तुम्हाला यामध्ये STD आणि रोमिंग कॉल्स अगदी मोफत मिळतील. तुम्हाला इतर रिचार्ज प्लॅन्स प्रमाणे या प्लॅनमध्ये Jio Cinema, Jio TV आणि Jio च्या इतर अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts