टेक्नोलाॅजी

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 GB डेटा मिळणार फक्त 150 रुपयात, किती दिवसाची व्हॅलेडीटी ? पहा…

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट आहे. जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिफोन कंपनी आहे. या कंपनीची ग्राहक संख्या वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांपेक्षा अधिक आहे.

विशेष म्हणजे ग्राहक संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे एअरटेलची ग्राहक संख्या देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यामुळे आता जिओ आणि एअरटेल मध्ये चांगले कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. परिणामी आता जिओच्या माध्यमातून ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जात आहेत.

कंपनीने ग्राहकांच्या गरजेनुसार काही स्वस्त आणि काही महाग प्लॅन लॉन्च केले आहेत. दरम्यान आज आपण रिलायन्स जिओचा डेली 1 GB चा सर्वात स्वस्त प्लॅन पाहणार आहोत.

कोणता आहे तो प्लॅन ?

रिलायन्स जिओ कंपनीकडून 149 रुपयांना एक प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना डेली वन जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळत आहे.

खरंतर कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये असणाऱ्या सर्व डेली डेटा प्लॅनमध्ये हा प्लॅन सर्वात फायदेशीर असल्याचे आढळून आला आहे.

149 रुपयांचा हा प्लॅन 20 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. या वीस दिवसांच्या कालावधीत ग्राहकांना डेली वन जीबी डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो.

या प्लॅन सोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड चे सबस्क्रीप्शन मिळते. मात्र जिओ सिनेमाचे प्रीमियम एक्सेस मिळत नाही.

जर तुम्हाला जिओ सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रीप्शन हवे असेल तर तुम्हाला याच सबस्क्रीप्शन वेगळे खरेदी करावे लागणार आहे.

निश्चितच ज्या ग्राहकांना डेली 1 GB डाटा पुरेसा होतो त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. या प्लॅन सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS चा देखील लाभ मिळणार आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts