टेक्नोलाॅजी

Jio Recharge Plan : जिओने ग्राहकांना दिला मोठा धक्का! आता मिळणार नाही ‘ही’ ऑफर

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन ऑफर घेऊन येत असते. ज्याचा कंपनीच्या ग्राहकांना खूप फायदा होतो. कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप आहे. कंपनीचे प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये बसतात. त्यामुळे कंपनी सतत इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते.

कंपनीने आता आपल्या ग्राहकांसाठी 5G सेवा आणली आहे. परंतु कंपनीने आपल्या ग्राहकांना खूप मोठा धक्का दिला आहे. आता एका शानदार प्लॅनमधून 40GB अतिरिक्त डेटा ऑफर काढून टाकली आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

जाणून घ्या रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे शानदार फायदे

खरंतर, रिलायन्स जिओकडून आपल्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमधून बोनस डेटा ऑफर आता काढून टाकण्यात आली आहे. हे लक्षात घ्या की जिओच्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनची ​​वैधता एकूण 84 दिवसांची आहे. समजा एखाद्याला दररोज 3GB डेटाची आवश्यकता पाहिजे तर हा प्लॅन सर्वात उत्तम पर्याय असू शकतो.

जिओ पूर्वी त्यांच्या 999 रुपयांच्‍या प्‍लॅनसह आपल्या ग्राहकांना 40GB बोनस डेटा देत होते, परंतु आता कंपनीने आता तो काढून टाकण्‍यात आला आहे. हा प्लॅन या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता. त्यावेळी कंपनीकडून असे सांगण्यात आले होते की, या प्लॅनमध्ये देण्यात आलेला 40GB बोनस डेटा 241 रुपयांचा आहे. इतकेच नाही तर कंपनीने हा प्लॅन लॉन्च करत असताना असेही सांगितले होते की ही बोनस डेटा ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे.

वास्तविक आता ती ऑफर काढून टाकली आहे. त्याऐवजी, ग्राहकांना आता Jio प्रीपेड प्लॅनमधून बोनस डेटा हवा पाहिजे असेल तर तुम्ही रु. 299, रु. 749 आणि रु. 2999 प्लॅनसह रिचार्ज करू शकता. कंपनीचे हे सर्व प्लॅन कंपनीची ७ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ग्राहकांसाठी बोनस डेटा आणत आहेत. ही शानदार ऑफर 5 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध असणार आहे हे लक्षात घ्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts