टेक्नोलाॅजी

Jio Recharge Plan : जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळताहेत अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंगसह शानदार फायदे, किंमत आहे फक्त..

Jio Recharge Plan : टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. त्यापैकी काहींच्या किमती जास्त असतात तर काहींच्या किमती ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या असतात. परंतु ग्राहक कमी किमतीचा रिचार्ज प्लॅन घेण्यास पसंती दर्शवतात.

असाच एक प्लॅन रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडियाने आणला आहे. ज्याची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. तसेच यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह शानदार फायदे मिळत आहेत. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. जाणून घेऊयात सविस्तर प्लॅन.

रिलायन्स जिओचा 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा हा शानदार प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत आहे. यात कंपनीकडून दररोज 3 जीबी डेटा देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6GB अतिरिक्त डेटा देखील मिळत आहे. त्यानुसार, प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 90 GB इतका होतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळत आहे. या प्लॅनमध्ये कंपनीकडून देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देण्यात येत ​​आहे. दररोज 100 मोफत एसएमएस देणाऱ्या या प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना आता Jio TV आणि Jio Cinema सोबत Jio Cloud वर मोफत प्रवेश मिळत आहे.

Vodafone-Idea चा 475 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी दररोज 4 जीबी डेटा देण्यात येत आहे. Vi app वरून हा प्लॅन रिचार्ज करणार्‍यांना 5 GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जात आहे. 28 दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळत आहे. Vodafone-Idea चा हा शानदार प्लॅन Binge ऑल नाईट बेनिफिट देखील मिळत आहे.

यामध्ये ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच या प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरचा फायदा मिळत आहे. या प्लॅनच्या सदस्यांना दर महिन्याला बॅकअपसाठी 2 GB पर्यंत डेटा डिलाइटचा लाभ मिळत आहे. त्याशिवाय या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी Vi Movies & TV Appsवर मोफत प्रवेश मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts