Jio Offer : रिलायन्स जिओ ही देशातील अग्रगण्य कंपनी असून, जिओ नेहमी वापरकर्त्यांसाठी स्वस्त रिचार्ज योजना आणते. कंपनी आपल्या महागड्या प्लॅनमध्येही वापरकर्त्यांना अनेक सेवा पुरवते. दरम्यान, लॉन्ग व्हॅलिडिटीसह मोफत कॉलिंग आणि डेटा सुविधा देणारा प्लान शोधत असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. जाणून घ्या या प्लॅनबद्दल.
जिओच्या पोर्टफोलिओमध्ये शॉर्ट टर्म ते लाँग टर्म अशा रिचार्ज प्लॅन्स आहेत. जिओच्या लिस्टमध्ये असा एक प्लान आहे ज्यामध्ये यूजर्सना 11 महिन्यांची दीर्घ व्हॅलिडिटी मिळते. दरम्यान, हा प्लॅन एका महिन्यासाठी 100 रुपयांपेक्षा कमी मध्ये मिळत असून, या प्लानमध्ये यूजर्सना फ्री कॉलिंग, इंटरनेट डेटा आणि फ्री एसएमएसची सुविधा सुद्धा मिळणार आहे.
reliance jio 895 रिचार्ज प्लॅन
जिओचा 895 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 336 दिवसांची वैधता देतो. जर आपण 28 दिवसांच्या रिचार्ज सायकलकडे पाहिले तर त्यात 12 सायकल उपलब्ध आहेत आणि जर आपण 30 दिवसांच्या प्लॅनचा विचार केला तर, 11 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 24GB डेटा मिळणार असून, यामध्ये 2GB डेटा 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. आता जर आपण कॉलिंगबद्दल बोललो तर यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. प्लॅन 28 दिवसांसाठी 50 एसएमएस मोफत देतो. एकूणच, ही योजना तुमच्या बजेटसाठी खूपच स्वस्त आहे.
जर या योजनेचा 28 दिवसांनुसार विचार केला तर, ग्राहकांना 28 दिवसांसाठी अंदाजे 75 रुपये मोजावे लागतील. 30 दिवसांचा खर्च पाहिला तर तो 81 रुपये येतो. ही योजना अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक फायदे हवे आहेत. हेच कारण आहे की जिओच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनमध्ये
त्याचा समावेश होतो.