टेक्नोलाॅजी

Reliance Jio : जिओचा भन्नाट प्लान! फक्त 900 रुपयांमध्ये एका वर्षासाठी डेटा आणि कॉलिंगसह मिळतायेत अनेक फायदे

Reliance Jio : जिओ अनेकदा आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लान आणत असते. आता कंपनीने आणखी एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक सुविधा मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्वस्त जिओ प्लानबद्दल सांगणार आहोत. कारण ते तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची ऑफर अगदी किमी किमतीत देते.

जिओ फोन ऑल-इन-वन प्लॅनची ​​किंमत 28 दिवसांच्या वैधतेसाठी 91 रुपये असेल. पण लक्षात ठेवा हा प्लान फक्त जिओ फोन वापरकर्त्यांसाठी असेल. जर तुम्ही 336 दिवसांसाठी प्लॅन बघत असाल तर तुम्हाला 1092 रुपये खर्च करावे लागतील. जिओ यासह अनेक प्लॅन ऑफर करते ज्यामध्ये कमी किमतीत अनेक फायदे बघायला मिळतात.

Reliance Jio (1)

जिओ फोन वापरकर्त्यांना जर एक वर्षासाठी रिचार्ज प्लॅन हवा असेल तर आणखी एक नवीन प्लॅन फक्त 899 रुपयांमध्ये मिळत आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग डेटा याचीही सुविधा मिळत आहे. पण यासाठीही तुम्ही जिओ फोन वापरकर्ते असणे आवश्यक आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.

यासोबतच कंपनी Jio Cinema, Jio TV ला अगदी मोफत प्रवेश देते. म्हणजेच फक्त 899 रुपयांमध्ये तुम्हाला मनोरंजनासाठी आवश्यक असे अनेक फायदेही मिळत आहेत. जिओचे हे प्लान तुम्ही कुठूनही खरेदी करू शकता. हा प्लॅन पेटीएम, फोनपेनेही रिचार्ज केला जाऊ शकतो. हा प्लॅन My Jio अॅपवरही उपलब्ध आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts