टेक्नोलाॅजी

Moto G62 5G Sale : आजपासून फ्लिपकार्टवर Moto G62 5G सेल, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स…

Moto G62 5G Sale : Motorola ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन Moto G62 भारतात लॉन्च केला आहे. आता कंपनी आजपासून या फोनची पहिली सेल फ्लिपकार्टवर सुरू करणार आहे. त्याची विक्री आज 19 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली. Moto G62 5G स्मार्टफोनचे 6 GB रॅम मॉडेल 17,999 रुपयांना आणि 8 GB रॅम मॉडेल 19,999 रुपयांना उपलब्ध असेल.

ऑफर

या फोनवर EMI शिवाय खरेदीवर रु. 1,500 ची सूट आणि Flipkart वरून HDFC बँक क्रेडिट कार्डने EMI वर रु. 1750 ची सूट मिळत आहे.

Moto G62 5G ची प्रमुख वैशिष्ट्ये

• डिस्प्ले – या फोनमध्ये 6.55 इंचाची डिस्प्ले स्क्रीन आहे, जी फुल एचडी डिस्प्ले देईल. यासोबतच यामध्ये 120 HZ चा रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे.

• प्रोसेसर – कंपनीने या फोनमध्ये 2.2 Ghz Qualcomm Snapdragon 695 5G Octa Core प्रोसेसर दिला आहे.

• कॅमेरा – Moto G62 5G मध्ये स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा फॉरमॅट देण्यात आला आहे. यात 50 MP मेन रियर कॅमेरा, 8 MP दुसरा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि फ्लॅशलाइटसह 2 MP तिसरा मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 16 MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.

• OS – हा फोन नवीनतम Android 12 सह लॉन्च करण्यात आला आहे.

• रॅम आणि इंटरनल स्टोरेज- हा फोन 6 GB रॅम, 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 8 GB रॅम, 128 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. यासोबतच मेमरी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत मेमरी वाढवता येते.

• बॅटरी- यात 5000 mAh बॅटरी आहे.

• इतर वैशिष्ट्ये – त्याच्या नावाप्रमाणेच, हा 5G फोन आहे. यात डॉल्बी अॅटमॉस फीचरसह स्टिरिओ स्पीकर्स आहेत. यासोबतच ब्लूटूथ, वाय-फाय, 3.5 एमएम जॅक या सर्व फीचर्सचाही समावेश आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts