टेक्नोलाॅजी

Motorola Razr 40 : जबरदस्त ऑफर! अवघ्या 8 हजारांत खरेदी करा 1 लाख रुपयांचा हा फोल्डेबल फोन, कसे ते पहा

Motorola Razr 40 : जर तुम्हाला कमी किमतीत फोल्डेबल स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही आता फोल्डेबल स्मार्टफोन अवघ्या 8 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी भन्नाट ऑफर जाणून घ्या.

अशी ऑफर Amazon वर मिळत आहे. तुम्ही या सेलमधून Motorola Razr 40 हा स्मार्टफोन 40% सवलत मिळवून खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 99,999 रुपये आहे. परंतु तुम्ही यावर मिळत असणाऱ्या सवलतीमुळे हा फोन 59,999 रुपयांना खरेदी करू शकता.

इतकेच नाही तर आता या फोनवर 52,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. परंतु जुन्या फोनच्या पूर्ण एक्सचेंजवर हा फोन 59,999 – 52,000 रुपयांमध्ये म्हणजेच 7,999 रुपयांना तुम्ही सहज खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला बँक ऑफरचाही लाभ मिळेल.

जाणून घ्या Motorola Razr 40 ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Motorola Razr 40 या स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून 6.9-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले फुल एचडी रिझोल्यूशन आणि 144Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. शिवाय कंपनी या फोनमध्ये 1.5 इंचाचा कव्हर डिस्प्ले देखील देत आहे. स्टोरेजचा विचार केला तर मोटोचा हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो.

तसेच प्रोसेसर म्हणून कंपनी या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Gen 1 चिपसेट देत आहे. तर वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल. इतकेच नाही तर कंपनी या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देखील देत आहे.

तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 4200mAh ची असून ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात वायरलेस चार्जिंगसाठीही सपोर्ट दिला असून हा फोन Android 13 OS वर काम करतो. Dolby Atmos साउंडने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम कार्ड, 5G, ब्लूटूथ, Wi-Fi 6E, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts