टेक्नोलाॅजी

Nokia Smartphone : सॅमसंग-ओप्पोची सुट्टी करायला आला नोकियाचा “हा” साक्तिशाली 5G स्मार्टफोन, बघा खास वैशिष्ट्ये

Nokia Smartphone : नोकिया कंपनीला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये, नोकिया फोन निर्माता कंपनी वर्षानुवर्षे ग्राहकांच्या हृदयावर राज्य करत आहे. कंपनीचे फोन दीर्घकाळ चालतात, त्यामुळे देशातील आणि जगातील लोकांचा कंपनीच्या या फोनवर विश्वास खूप आहे. आता जग 5G चे आहे, अशा परिस्थितीत कंपनीने धमाकेदार प्लॅनिंग सुरु केले आहे, कंपनी आता Samsung, Oppo, Realme सोबत स्पर्धा करण्याची पूर्ण तयारी करत आहे.

कंपनीच्या Nokia G60 5G या स्वस्त फोनची विक्री सुरू झाली आहे. दरम्यान, जर तुम्हाला हा फोन घ्यायचा असेल, तर तुम्ही Nokia G60 5G बद्दल सर्व तपशील जाणून घेऊया.

तुम्ही शक्तिशाली आणि उच्च किमतीचा 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Nokia G60 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक असू शकतो. नोकियाने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनने भारतीय बाजारपेठेत दहशत निर्माण केली आहे.

Nokia G60 5g स्मार्टफोनची स्वस्त किंमत

नोकियाने बनवलेला हा Nokia G60 5g स्वस्त स्मार्टफोन फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे जो या कॉन्फिगरेशनमध्ये 6GB 128GB मध्ये उपलब्ध आहे. Nokia G60 5G ची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Nokia G60 5g स्वस्त स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Nokia G60 5g स्वस्त स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा LCD फुल एचडी डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि कमाल 500nits ब्राइटनेस आहे. सोबतीला Nokia द्वारे Corning Gorilla Glass 5 संरक्षण दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचचे एचडी प्लस रिझोल्यूशन आहे.

Nokia G60 5G च्या मागील बाजूस, तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 5 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.

Nokia Smartphone (3)

त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी देण्यात आला आहे. Nokia G60 5g हा स्मार्टफोन Android 12 OS सह सुसज्ज आहे.यासोबतच या उपकरणाला 2 वर्षांची वॉरंटी देखील मिळते.

ज्या ग्राहकांना Nokia G60 5g स्वस्त स्मार्टफोन घ्यायचा आहे ते कंपनीच्या पोर्टलवर जाऊन खरेदी करू शकतात. ज्यामध्ये कंपनी अनेक प्रकारच्या ऑफर्स देखील देत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts