टेक्नोलाॅजी

Nothing Phone (1) स्मार्टफोनवर मिळत आहे मोठी सूट; 50MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह उत्तम फीचर्स

Nothing Phone (1) : तुम्‍ही नवीन स्‍मार्टफोन खरेदी करण्‍याचा विचार करत असल्‍यास, नथिंग फोन 1 वर मोठी सूट मिळणार आहे. 30 जुलै पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नथिंग ब्रँडचा हा पहिलाच स्मार्टफोन असून त्याला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर असलेला हा फोन लोकांच्या खूप पसंतीस उतरला आहे.

यात 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 4500mAh बॅटरी दिली आहे, जी 33W चार्जिंगला सपोर्ट करते. यात वायरलेस चार्जिंगसारखे फीचर्स आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दलची ऑफर.

Nothing Phone (1) किंमत आणि विक्री

स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्याच्या बेस व्हेरिएंट म्हणजेच 8GB रॅम 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 32,999 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे.

Nothing Phone (1) मिळणार मोठी सूट

12GB रॅम 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंट 38,999 रुपयांना येतो. तुम्ही हँडसेट दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता यात काळा आणि पांढरा रंग असणार आहे. यावर फोनवर HDFC बँकेच्या कार्डांवर 2000 रुपयांची सवलत मिळणार आहे.

स्पेसिफिकेशन काय आहेत?

Nothing Phone (1) स्मार्टफोन Android 12 वर कार्य करतो. यात 6.55-इंचाचा फुल HD OLED डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. तुम्हाला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस गोरिल्ला ग्लास संरक्षण मिळेल.

हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरवर काम करतो. यात 12GB पर्यंत RAM चा पर्याय मिळेल. हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. दुसरी लेन्स देखील 50MP चं आहे.

पुढे कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. Nothing Phone 1 मध्ये 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 4500mAh बॅटरी दिली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 15W वायरलेस चार्जिंग मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts