OnePlus 10R 5G : स्वस्तात OnePlus चा 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टची शानदार सेल फक्त तुमच्यासाठीच आहे. या ठिकाणाहून तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता. तुमची 10 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत होऊ शकते.
अशी शानदार ऑफर OnePlus 10R 5G या फोनवर मिळत आहे. या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये आहे. तो तुम्ही आता 9,111 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 29,888 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफर आणि मुख्य सवलतीसह वनप्लसच्या या स्मार्टफोनवर सवलत 10,611 रुपयांपर्यंत मिळत आहे. तसेच तुम्हाला हा फोन EMI वरही खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा सर्वात जास्त विक्री करणारा स्मार्टफोन आहे. आता तुम्ही तो कमी किमतीत घरी नेऊ शकता.
जाणून घ्या OnePlus 10R 5G ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
जर या फोनच्या स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर हा OnePlus फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात तुम्हाला खरेदी करता येईल. यात MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले मिळेल. तर डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिला आहे.
तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश आहे. तसेच सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या या OnePlus 10R 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 12 वर आधारित नवीनतम Oxygen OS वर काम करत आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी WiFi 802.11 a/b/g/n/ac/ax, NFC, Bluetooth 5.3 आणि GPS सारखे पर्याय दिले आहेत. हा फोन फॉरेस्ट ग्रीन आणि सिएरा ब्लॅक असा दोन रंग पर्यायांमध्ये येतो.