टेक्नोलाॅजी

OnePlus 11 5G : अवघ्या 11,449 रुपयांमध्ये घरी न्या हा OnePlus चा सर्वात शक्तिशाली 5G फोन, मिळेल 12GB RAM आणि 100W चार्जिंग सपोर्ट

OnePlus 11 5G : वनप्लस या स्मार्टफोन निर्माता कंपनीने बाजारपेठेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीच्या जवळपास सर्वच स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. कंपनी आता आपले 5G फोन लाँच करू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला OnePlus 11 5G हा फोन लाँच केला होता. ज्याची मूळ किंमत 61,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही तो आता अवघ्या 11,449 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर कुठे मिळत आहे ते जाणून घ्या.

OnePlus 11 5G चे फीचर्स

OnePlus 11 5G हा फोन तुम्हाला टायटन ब्लॅक, इटरनल ग्रीन आणि मार्बल ओडिसी कलर अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. तसेच तो रॅम आणि स्टोरेजनुसार 8GB 128GB आणि 16GB 256GB दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस संरक्षणासह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

मिळेल मजबूत कॅमेरा

वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्स, 48-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 32-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्ससह तीन शक्तिशाली मागील कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. हा फोन Android 13 वर काम करेल. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असून तो 100W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो.

12 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करा OnePlus 5G

खरंतर कंपनीचा OnePlus 11 5G हा प्रीमियम स्मार्टफोन असून या फोनचा 16GB रॅम इटरनल ग्रीन कलर व्हेरिएंट Amazon वर मोठ्या ऑफरसह सूचीबद्ध केला आहे. Amazon च्या सेलमध्ये या स,स्मार्टफोनवर 50,550 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. समजा तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल आणि तुम्ही त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यास व्यवस्थापित करत असाल तर OnePlus 11 5G या स्मार्टफोनची किंमत फक्त रु. 11,449 (₹61,999 – ₹50,550) असणार आहे.

परंतु, या ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनसची किंमत तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती, मॉडेल आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे . इतकेच नाही तर या फोनवर बँक ऑफर उपलब्ध आहेत. त्यामुळे आता खरेदी करण्यापूर्वी, दोन्ही ऑफरचे तपशील नीट जाणून घ्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts