OnePlus India : चायनीज टेक ब्रँड वनप्लस स्मार्टफोनची मार्केटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख आहे त्यांच्या उपकरणांना खूप पसंती दिली जाते. कंपनीचे नॉर्ड-सिरीज उपकरणे ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि बिल्ड गुणवत्ता प्रदान करतात. दरम्यान, कंपनीचा एक फोन सध्या ग्राहकांना सर्वात कमी किमतीत मिळत आहे. कोणता आहे तो फोन पाहूया…
OnePlus Nord CE 3 Lite 5G ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर विशेष सवलतींसह ऑर्डर केले जाऊ शकते. कंपनीने गेल्या वर्षी हा फोन 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणला होता, पण आता फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त बँक ऑफर आणि एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे.
Nord CE 3 Lite 5G, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा बेस व्हेरिएंट Amazon वर 19,999 रुपयांऐवजी केवळ 17,499 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. इतकेच नाही तर ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास त्यांना 1,000 रुपयांची झटपट सूट मिळत आहे. अशा प्रकारे फोनची किंमत 16,499 रुपये होत आहे. इतर निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला आणखी सवलत मिळेल.
जर ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्सचेंज करायचा असेल, तर त्यांना 16,500 रुपयांपर्यंतची एक्स्चेंज सूट देखील मिळू शकते, ज्याचे मूल्य जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असते. तुम्ही फक्त बँकेच्या ऑफर किंवा एक्सचेंज डिस्काउंटपैकी एकाचा लाभ घेऊ शकता. हा फोन दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध
Nord CE 3 Lite 5Gची वैशिष्ट्ये
OnePlus फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंच डिस्प्ले आहे आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह 16GB रॅम उपलब्ध आहे. याशिवाय बॅक पॅनलवर 108MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 16MP सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनला अलीकडेच Android 14 अपडेट प्राप्त झाले आहे. ड्युअल स्पीकरसह या फोनची 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह येते.