OnePlus Ace 3 : OnePlus स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनेक एकपेक्षा एक दमदार स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यांच्या स्मार्टफोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता OnePlus त्यांचा आणखी एक शानदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
OnePlus स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून Ace 3 स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन OnePlus 12R म्हणून रीब्रँड केला जाऊ शकतो. 23 जानेवारीला OnePlus चा हा स्मार्टफोन लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.
OnePlus Ace 3 स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट, 5,500mAh बॅटरी, 50MP प्राथमिक सेन्सर आणि 16GB पर्यंत रॅम देण्यात आले आहे.
OnePlus Ace 3 ची किंमत
OnePlus Ace 3 च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच अंदाजे 30,000 रुपये आणि 16GB RAM + 512GB मॉडेलची किंमत CNY 2,999 म्हणजेच 33,000 रुपये आहे. OnePlus Ace 3 च्या 16GB RAM + 1TB स्टोरेज व्हेरिएंट किंमत CNY 3,499 म्हणजेच अंदाजे 40,000 रुपये आहे.
स्मार्टफोनमध्ये मून सी ब्लू, मिंग शा जिन आणि स्टार ब्लॅक असे रंग पर्याय देण्यात आले आहेत. भारतात या स्मार्टफोनचे प्री-बुकिंग सुरू करण्यात आले आहे. 15 जानेवारीपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी बाजारात सादर केला जाईल.
OnePlus Ace 3 चे तपशील
OnePlus Ace 3 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा Oriental AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 4,500nits पीक ब्राइटनेस, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz क्विक सॅम्पलिंग रेट आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे.
OnePlus Ace 3 स्मार्टफोनमध्ये octa-core 4nm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिला आहे. 12GB किंवा 16GB LPDDR5x आणि Adreno 740 GPU आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे.
OnePlus Ace 3 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 50MP Sony IMX890 प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड-एंगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेराचा समावेश आहे. 16MP फ्रंट सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॅमेरा देण्यात आला आहे.
OnePlus च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,500mAh बॅटरी देण्यात आलिया आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एक जबरदस्त बॅटरी पॅक असलेला स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.