टेक्नोलाॅजी

OnePlus Nord 3 : वनप्लसच्या ‘या’ दोन स्मार्टफोनवर होईल 36 हजारांपर्यंतचा मोठा फायदा, कुठे मिळत आहे संधी? पहा

OnePlus Nord 3 : अल्पावधीतच वनप्लसने ग्राहकांना भुरळ घातली आहे. कंपनीच्या जवळपास सर्वच स्मार्टफोनला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. कंपनीही मागणीमुळे आपले अनेक स्मार्टफोन बाजारात लाँच करत असते.

परंतु या फोनची किंमत खूप जास्त असते. परंतु आता तुम्ही वनप्लसचे OnePlus Nord 3 आणि OnePlus 11R हे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्हाला 36 हजारांपर्यंत मोठा फायदा होईल. Amazon वर ही सवलत मिळत आहे.

जाणून घ्या OnePlus 11R स्मार्टफोनचे फीचर्स

OnePlus 11R फोनमध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळेल. ज्याला 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 8GB आणि 16GB रॅमच पर्याय दिला आहे. तर कंपनी यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर देत आहे. वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. तर त्याच वेळी, सेल्फीसाठी समोर 16MP कॅमेरा दिला जात आहे. यामध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी दिली आहे.

जाणून घ्या ऑफर

ऑफरबदल बोलायचे झाले तर OnePlus 11R स्मार्टफोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 39,999 रुपयांना लिस्ट केला आहे. तसेच बँक ऑफर अंतर्गत यावर 1,000 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. तसेच तुम्हाला यावर 36 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. परंतु तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असावा.

जाणून घ्या OnePlus Nord 3 चे फीचर्स

ग्राहकांना या स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा पंच होल AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1.5K पिक्सेल इतके आहे. जे 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह MediaTek Dimensity 9000 च्या चिपसेटमध्ये येईल. तर या फोनमध्ये दोन स्टोरेज प्रकार दिले आहेत. यात त्याच्या 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह दोन इतर कॅमेरे देण्यात आले आहेत. 5,000mAh ची जबरदस्त बॅटरी दिली आहे.

तर या फोनच्या 128 GB वेरिएंटची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. ज्याला आठवड्यातील टॉप डीलमध्ये 500 रुपयांची बँक ऑफर देण्यात येत आहे. तर 32 हजारांची हीच एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts