टेक्नोलाॅजी

Oneplus Nord CE 2 Lite 5G Offer : बंपर ऑफर! OnePlus चा 17,999 रुपयांचा शक्तिशाली 5G फोन खरेदी करा फक्त 1799 रुपयांमध्ये, पहा ऑफर

Oneplus Nord CE 2 Lite 5G Offer : भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करता येत नाहीत. कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोने खरेदी करता यावेत यासाठी अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

तुम्हीही कमी बजेटमध्ये शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. Oneplus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनवर बंपर ऑफर दिली जात आहे.

Oneplus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनची बाजारातील किंमत 17,999 रुपये आहे. मात्र या दमदार स्मार्टफोनवर ऑफर देण्यात येत असल्याने ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. हा स्मार्टफोन २ हजार रुपयांपेक्षा स्वस्त मिळत आहे.

तुम्ही देखील या स्मार्टफोनवर देण्यात येत असलेल्या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स Amazon कडून OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनवर ऑफर दिली जात आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट स्मार्टफोन तुम्ही खरेदी करण्यासाठी गेला तर तुम्हाला हा स्मार्टफोन 17,999 रुपयांना दिसेल. मात्र जर हाच स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून खरेदी केला तर तुम्हाला हा स्मार्टफोन अगदी 1799 रुपयांमध्ये मिळेल.

बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर

जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करताना ICICI बँक क्रेडिटवरून पेमेंट केल्यास तुमची 500 रुपयांची बचत होईल. तसेच हा स्मार्टफोन तुम्ही EMI पर्यायावर देखील खरेदी करू शकता.

तसा पर्याय याठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही २ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

जर तुम्ही OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन खरेदी करताना एक्सचेंज ऑफरमध्ये तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्हाला १६२०० रुपयांची ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन तुम्ही अगदी १७९९ मध्ये खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts